Posts

कॅसेट एरा

९० च्या दशकाच्या मधली गोष्ट ! माझ्या मामांच कॅसेट्सच दुकान होत. तो काळ म्हणजे कॅसेटयुगाचा सुवर्णकाळ होता !! विश्वात्मा, त्रिदेव, मोहरा, साजन, बाजीगर, अशा अनेक कॅसेट्स पार्लर,ऑटोरिक्षा, रसवंती, काळी-पिवळी...अशा कानाकोपऱ्यात वाजत असत. रिक्षावाले तर म्युजिक सिस्टिम आहे ह्या कारणास्तव जास्त भाडे घेई. गुलशनकुमारने टी सिरीजच्या माध्यमातून आणलेल्या सोनू निगम, अनुराधा पौडवालच्या आवाजातल्या अनेक भक्तीगीतांच्या कॅसेट्स तडाखेबंद विकल्या जाई. अल्ताफ राजाच्या 'तुम तो ठहरे परदेसी'च्या पिशव्या भरभरून कॅसेट्स मी मामांना वितरकाकडुन आणून दिल्याचे आजही आठवत.  फक्त फिल्मी गाणीच नव्हे तर जॉनी लिव्हर, जॉनी रावत ह्यांच्या मिमिक्री, विनोदांच्या कॅसेट्स पण लोकप्रिय होत्या.  कोळीगीतांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ होती. वेसावची पारू किंवा टॉप टेन कोळीगीताच्या कॅसेट्स हातोहात विकल्या जाई.  छगन चौघुलेंच्या आवाजातल्या चांगुणाची कथा, सती अनुसयाची कथा, चिलया बाळाची कथा.... अशा अनेक आख्यायिकांचा स्वतःचा एक श्रोतावर्ग होता.  सिझनल खपणाऱ्या कॅसेट्स अनुभवातून कळू लागल्या होत्या. स्वातंत्र्यदिन जवळ आला ...

मंगरुळ तें वॉशिंग्टन

मंगरुळ तें वॉशिंग्टन ‘देऊळ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटात एक धमाल पात्र आहे. मंगरुळ नावाच्या विकासापासून कोसो दूर असलेल्या एका खेडेगावात, एक महिला सरपंच (आतिशा नाईक) असते. पण तिच्या सरपंचपदाआडून गावातला मातब्बर असामी असलेला भाऊ (नाना पाटेकर) आणि त्यांचा पुतण्या (श्रीकांत यादव) यांच्यातलेच कुरघोडीचे राजकारण चालू असते. तिच्या सासूच्या (उषा नाडकर्णी) लेखीसुद्धा तिच्या सरपंच असण्याची किंमत शून्य असते. एखाद्या अडचणीच्या वेळी सरपंच बाई कामाला निघाल्या, की सासूबाई ‘नुसतं फराफरा अन टराटरा’ म्हणत तिला उद्देशून टोमणे मारत असते. हे उद्योग करण्यापेक्षा कुठे वाळवणाला गेलीस तर चार पापड मिळतील, नुसती शायनिंग काय कामाची, हीच काय ती तिच्या सासूची माफक अपेक्षा! मंगरूळ गावच्या कथेचा हा ट्रॅक पुढे दत्त मंदिराच्या उभारणीकडे जातो. पण जाताना हसवता हसवता आपल्याला अंतर्मुख करून जातो, कारण गावपातळीवरचा हा राजकारणी महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण स्वतः कुठे ना कुठेतरी अनुभवलेला असतोच. केवळ कथेतील मंगरूळच नव्हे तर जगाच्या पाठीवर याविषयी काय वेगळे चित्र दिसत आहे? आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदा...

2020

Image
२००८ साली IPL चा पहिला सिझन झाला आणि भारतात एका नव्या युगाची नांदी झाली होती. खेळाच्या जुन्या सर्व संकल्पना, रूढी, गेमप्लॅन, रीतिरिवाज, संघभावना मोडीत काढत क्रिकेटविश्वात एका नव्या युगाचा आरंभ झाला होता. हे युग होत २०-२० क्रिकेटच !!  अनेक आजी-माजी खेळाडूंनी ह्यावर टीकेची झोड उडवली. क्रिकेटचा सत्यानाश होईल ही भविष्यवाणी वर्तवली गेली. पैशांची उधळपट्टी, चियरगर्ल्स संस्कृती, सामन्यानंतरच्या पार्ट्या, ग्लॅडीएटरसारखे लिलाव करून घेतले जाणारे खेळाडू हे सर्व नविन होत.  हे २०-२० युग काय दाखवणार होत ह्याची झलक पहिल्याच सिझनला दिसली. द्रविड, कुंबळेचा बेंगलोर संघ T20 च्या वेशातील कसोटी संघ म्हणुन हिणवला गेला,  सचिन, सौरवचे प्रबळ दावेदार संघ तळाशी राहिले, राजस्थान रॉयलसारखा अनपेक्षित संघ बाजी मारून गेला, स्वप्नील असनोडकर, धवल कुलकर्णी, अशोक दिंडा वैगेरे हिरो मानले गेले. त्या त्या देशाचे खेळाडू इथे पैसे जास्त मिळतात म्हणून स्वतःच्या देशातील क्रिकेट सोडून इथे खेळू लागल्याने "क्लब मोठा की देश?" अशा चर्चा रंगू लागल्या.  केवळ देशच काय पण IPL च्या एका संघाशी एकनिष्ठ राहणेही अवघड होऊ लाग...

शाळा

'कुसुमाग्रज' म्हणजे निर्विवाद भाषाप्रभु ! त्यांच्या ओजस्वी लेखणीतून कित्येक कविता लिहिल्या गेल्या. अवीट गीते रचली गेली. तशीच आमच्या शाळेची प्रार्थना पण त्यांनीच लिहिली होती. आमची प्राथमिक शाळा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शाळांपैकी एक होती. आजही शाळेचे ते विस्तीर्ण पटांगण आठवते. त्या प्रार्थनेला चाल कोणी दिली होती माहीत नाही पण खूप सुमधुर संगीत होत. एकेक कडव 'शाळा' आणि 'शिक्षणा'प्रति भक्तिभाव जागृत करेल असं होतं. शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थ्यांच्या रांगा एकासुरात हात जोडून प्रार्थना म्हणायचा हे खुप सुंदर दृश्य होत. आज शाळेची ती जुनी वास्तू जमीनदोस्त झाली आहे. शाळा नवीन जागी स्थलांतरित झाली आहे. प्रार्थना अद्याप तीच आहे की नाही माहीत नाही. डॉन बॉस्को, झेव्हीयर, न्यू एरा, फ्रावशी अशा नावांच्या गदारोळात ती प्रार्थना कुठेतरी हरवून गेली आहे. 'शाळेच स्टेट्स' डाऊन होऊ नये म्हणून पालकांकडे 4 व्हीलर असेल तरच प्रवेश द्यायचा, असे निकष असलेल्या काही नवीन शाळा निघाल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळा नाही म्हटलं तरी अखेरचा श्वास घेत आहेत. काही कॉन्व्हेंट शाळा मुल...

MPSC 2

हवालदार पदाच्या ११३७ जागांसाठी २ लाख अर्ज ही बातमी वाचली. किती जणांनी गांभिर्याने अर्ज भरले सांगता येणार नाही पण यापैकी ४२३ (अभियंते) इंजिनियर होते. यामध्ये बेरोजगारीसाठी सरकारला दोष देऊन उपयोग नाही. मी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला त्यावेळेस म्हणजे या शतकाच्या सुरुवातीला नाशिकसारख्या शहरात फक्त २-३ इंजिनियरिंग कॉलेजेस होते. व थोडेफार तेवढेच तंत्रनिकेतन होते. पण गेल्या एक दीड दशकात दरवर्षी १-२ कॉलेजच्या वेगात वाढ होत आहेत. एक कॉलेज वाढणे म्हणजे त्या विद्याशाखेतील जवळपास ६० (Intake लक्षात घेता), स्पर्धक वाढतात. एवढ्या प्रमाणात इंजिनियर उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतील तर त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांची संख्या पण त्या प्रमाणात वाढली पाहिजे. पण दुर्दैवाने त्याकाळात जेवढी कंपन्यांची संख्या होती, तेवढीच आजही आहे. आणखी किती दिवस BOSCH-MAHINDRA-HAL ह्यांच्याकडून रोजगाराची अपेक्षा बाळगणार?? नवीन कंपन्या आल्या तरी त्यांना तेवढा ग्राहकवर्ग मिळेल का?? ही आकडेवारी खूप भयावह आहे.

रामायण-महाभारत

कालचे 'रामायण आणि महाभारत' ह्यांचे एपिसोड म्हणजे आयुष्यभर ध्यानी ठेवावे असे, धडे होते. #महाभारत - हस्तिनापूरच्या विभाजनानंतर आपल्या वाटेला ओसाड, वैराण भूमी आली म्हणुन पांडवांनी खचून न जाता कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली तिथे नविन शहर वसवले. कृष्णाने त्यांना समजावले की आता हिच तुमची 'कर्मभूमी' आहे. इंग्रजीत एक Quote आहे, 'There is a great value in disaster, we can start all over again' लाक्षागृह आग आणि हस्तिनापूरच्या फाळणीतुन पांडवांनी हाच बोध घेतला असावा. आता सगळं संपलं ही भावना जेव्हा आयुष्यात येते, तेव्हाच कदाचित आपल्या हातुन आणखी चांगलं किंवा भव्य घडण्याची शक्यता असते. हा आशावाद खुप महत्वाचा आहे. पंजाबी, सिंधी, पारशी हे समाज सातत्याने व्यापार उदिमात पुढे राहिले आहेत. वाळवंटी भागातले 'अरब व मारवाडी' देखिल व्यापारात दीर्घकाळ पुढे आहेत ह्याचे कारणही तेच आहे. स्वतःच्या मातृभूमीत येणारी सुखलोलुप जीवनशैली मनुष्याला निर्धास्त करत असते. Survival instinct नावाची त्याची भावना कमी करत असते, त्यामुळे स्वतःच्या चौकटीबाहेर गेल्यावर त्याला जगणे दुष्कर होऊन जाते...

ताजमहल

Image
हिंदी सिनेमात दोन कलावंतांतील मतभेद, वाद-विवाद, शत्रुत्व ही नविन गोष्ट नाही. कधी 'व्ही.शांताराम-दादा कोंडके', कधी 'कुमार सानु-उदित नारायण,' कधी 'सलमान खान-विवेक ओबेरॉय'.... !! ह्यांच्या कथा मसाला लावुन सांगितल्या जातात. पण दोन गीतकारांमधील वैचारिक मतभेद त्यांच्या कलेतून कसे व्यक्त होतात ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे 'साहिर लुधियानवी' आणि 'शकील बदायुनी' ह्यांच्यातील ताजमहालावरील 'war of words'!! शकील बदायुनींचा जन्म उत्तरप्रदेशच्या एका धार्मिक कुटुंबात झाला होता. शायर म्हणून तिथे त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला होता. अलिगढ विद्यापीठात शिकत असतानाच उत्कृष्ट शायर म्हणुन त्यांनी प्रसिद्ध झाले होते. मुंबईत आल्यानंतर मुघल-ए-आझम, बैजु बावरा, दिदार, गंगा जमुना सारख्या सिनेमातून त्यांनी अनेक अजरामर गीते सिनेविश्वाला दिली. चौदहवी का चांद हो, हुस्नवाले तेरा जवाब नही, कही दीप जले...!! ह्या गीतांसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले. दुसरीकडे साहिर लुधियानवी हे पंजाबच्या लुधियानाचे, मूळ नाव अब्दुल हायी..!! फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. वैयक्तिक ...

In Nolan we trust

Image
कॉलेजच्या दिवसात मित्रांची रूम म्हणजे आमच्यासाठी मिनी थिएटर होत ! ' शिंडलर्स लिस्ट' सारखा All time classic असो अथवा 'द अंग्रेज' सारखा छपरी हैद्राबादी सिनेमा, आमच्या रसिकतेला कशाचेही वावडं नव्हतं ! कधी कधी लॅपटॉपवर 'शोले' लावून सर्वजण एकासुरात त्याचे पाठ झालेले संवाद म्हणायचो ! अशातच एके दिवशी मित्राने त्याच्या हॉलिवूड फोल्डरमधला 'मेमेंटो' दाखवला ! पहिली रिएक्शन होती की 'हे काय चाललंय बे!' पण नंतर जाणवलं की असे काही out of the track बघायची सवय नव्हती ! ख्रिस्तोफर नोलान हे नावं पहिल्यादा ऐकलं ते त्या चित्रपटाच्या निमित्ताने ! पुढे नोलानच्या चित्रपटांनी मनावर एक गारुढच केलं ! इंटरस्टेलर ,इन्सेप्शन, अशा एकापेक्षा एक भन्नाट कलाकृती त्याने सादर केल्या, पण त्यामध्ये हॉलिवूडच्या परंपरेत बसणारा सवंगपणा, अश्लीलपणा अजिबात नव्हता ! कथा ह्या शक्यतो sci fi स्वरूपातल्या असल्या तरी विज्ञानाने आणलेले माणुसकीशून्य चित्रण त्यात नव्हते ! स्मृती, अंतर्मन, कृष्णविवर अशा अफलातून आणि मति गुंग करणाऱ्या कथा रंगवताना त्याने केलेले स्क्रिप्ट रायटिंग हे अभ्यासाचा विषय हो...

ए.आर.रहमान

Image
आज वयाची पस्तिशी ओलांडणाऱ्या आणि रूढार्थाने तरुणाईचे दिवस मागे पडत चाललेल्या माझ्या पिढीवर तीन लोकांचा मोठा प्रभाव आजवर राहिला आहे. पहिला म्हणजे शिवाजी पार्कच्या गल्लीबोळात क्रिकेट खेळता खेळता जागतिक दर्जाचा खेळाडू झालेला एक मराठीच्या प्राध्यापकाचा मुलगा, दुसरा म्हणजे दिल्लीहून मुंबईला सिनेमात नशिब आजमावायला आलेला एक होतकरू अभिनेता ज्याला अभिनयाची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती, आणि तिसरा म्हणजे शाळा शिकायच्या वयात लहानपणी डोक्यावरून वाद्ये भाड्याने देण्यासाठी वाहुन नेणारा एक मद्रासी तरुण !! होय ! सचिन, शाहरुख, रहमान ह्या तिघांनी आम्हा 90's kids वर स्वतःची एक अमिट छाप सोडली आहे. ह्या तिघांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कारकिर्दीचे शिखर गाठले तेव्हा तिघांचे वडिल ते पाहण्यास हयात नव्हते.( सचिनच्या वडिलांनी त्याला वर्ल्डकप उचलताना बघायला हव होत अस नेहमी वाटत.) ए.आर.रहमान...! 'मेरी जंग' सिनेमातल्या अनिल कपुरची वाटावी अशी ह्याच्या आयुष्याची चित्तरकथा ! मंदिरात भजन-प्रवचन करणाऱ्याचा नातू आणि गळक्या छपराच्या छोट्या घरात राहणाऱ्या वायरमनचा हा मुलगा, मूळ नाव दिलीप !! एवढीच त्याची ...

किशोरदाची जीवनगाणी

Image
सॉक्रेटिस, एरिस्टॉटल पासुन कार्ल मार्क्स, विवेकानंदांपर्यत ह्या जगात अनेक तत्ववेत्ते होऊन गेले. 'जिवन/जिंदगी/जीना...' याविषयांवर त्यांनी बरेच तत्वज्ञान जगाला ऐकवलं जे आजही शाळा,कॉलेजेसच्या भिंतीपासून फेसबुक वॉलपर्यंत वाचायला भेटते. पण ह्या साऱ्यांच्या पलिकडे असलेला एक गडी फार वेगळा होता, ज्याने आयुष्याचे सर्व धागे उलगडून दाखवले. 'शब्द' जरी त्याचे नव्हते तरी त्याच्या आवाजाने ती जीवनगाणी अजरामर होत गेली. तो अवलिया होता अर्थातच 'किशोरदा'!! एक गायक म्हणून त्याची कारकिर्द उशिरा सुरू झाली, पण तो जेवढं गायला ते पिढ्यानपिढ्या पुरून उरेल एवढं अनमोल संचित आहे. एका ठिकाणी तो गातो, ‘जिंदगीका सफर, है यह कैसा सफर कोई समझा नही” तर दुसरीकडे तोच स्वतःला समजावतो की “जिंदगीके सफरमे गुजर जाते है जो मुकाम, वो फिर नही आते!!!’ “एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नही” म्हणत तो ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाना’ हा राग आळवतो. तर दुसरीकडे “जिंदगी एक सफर है सुहाना” म्हणत हसत हसत जगायचा संदेश देतो. कधी आपल्या प्रेयसीला म्हणतो,”तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही”, तर तिलाच पुन्ह...

अंडरटेकर

Image
आयुष्याच्या रहाटघाडग्यात काही माणसे अशी भेटतात कि त्यांचा आणि तुमचा काहीच संबंध नसतो पण त्यांचं डोळ्याआड जाणं तुम्हाला रुखरुख लावुन जात ! WWE CHAMPION अंडरटेकर हे नाव अशाच काही लोकांपैकी एक ! तुफान आदळआपट आणि हाणामारी असलेल्या ह्या खेळाबद्दल मला फारसं आकर्षण कधीच नव्हतं पण शालेय जीवनात इतर मित्रांमध्ये ह्याची क्रेझ होती म्हणून त्याची माहिती ठेवावी लागायची !! त्यातूनच अनेक नावे परिचित झाली होती, ट्रिपल एच, रॉक, योकोझुना, शॉन मायकल, केन असे एकापेक्षा एक धिप्पाड गडी ओळखीचे झाले. ह्या सर्वामध्ये अंडरटेकरबद्दल तर खूप कुतूहल होत. त्याची अंधारात होणारी एंट्री, चितपरिचित पार्श्वसंगीत, दिव्यांचा लखलखाट, आणि चाहत्यांचा जल्लोष हे सारं पाहुन आता बरीच वर्षे लोटली !! अंडरटेकर पुन्हा पुन्हा जन्म घेतो, त्याचाकडे स्पेशल पॉवर आहे, एका बाटलीत त्याचे प्राण आहे अशा भाकडकथावर विश्वास ठेवण्याच तेे दिवस होते. हे लोक खरच हाणामारी करतात की लुटुपुटीची असते हे शेवटपर्यत कळायचं नाही. कॉम्प्युटरच्या किंवा टीव्हीच्या व्हिडीओ गेममध्ये सुद्धा त्यांना घेऊन मारामारी करण्याची गंमतच न्यारी होती. पुढे महाविद्यालयात प...

हे व्यर्थ न हो बलिदान

Image
पुलवामा आणि बालाकोटच्या घटनानंतर फेसबुकची वॉल रंगवणाऱ्या मित्रांनो या घटनेची तीव्रता देखिल तेवढीच महत्वाची समजुन दखल घ्या. पंजाबमध्ये अन्न व औषधे निरीक्षक पदावर काम करणाऱ्या नेहा शोरी ह्या प्रामाणिक महिला अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. आज सर्व पंजाब ड्रग माफियांनी वेढला जात असुन देशाची भावी तरुणाई पोखरून काढण्याचे षडयंत्र भारताचे शेजारी राष्ट्र करत आहे. हे कोणत्याही हिंदी सिनेमातील दृश्य नाही. १९७१ साली भारताकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यावर पाकिस्तानला कळून चुकले की भारताला सरळ युद्धात हरवणे अवघड आहे, म्हणून त्यांनी युद्धाची वेगळी रणनीती आखली. पंजाब रेजिमेंट किंवा शीख समुदाय ही भारतीय सैन्याची ताकद आहे हे ओळखुन त्यांनी त्यावरच घाव घालण्याचे ठरवले. फुटीरतावादी खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. पंजाबी युवकांची माथी भडकवली. पुढे भारताच्या प्रधानमंत्र्यांची व लष्करप्रमुखांची आहुती घेऊन धुमसणारा पंजाब काही काळ शांत झाला. आता ड्रग्सच्या माध्यमातून छुप्या युद्धाची तयारी त्यांनी चालवली आहे. नेहा शोरी सारख्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याने ड्रग्स विक्रेत्यांच्या...

World Piano day

एकदा कुठेतरी वाचल होत की, जे संगीत ऐकून पाय हालतात (दाद देतात) ते पाश्चिमात्य संगीत असत आणि जे संगीत ऐकून डोक हलते (दाद देतात) ते भारतीय संगीत असत. ह्यातला देशप्रेमाचा भाग सोडला, तर संगीताला कोणतीही सीमारेषा नसते. 'पियानो' हे त्याचं सुंदर उदाहरण आहे. १७ व्या, १८ व्या शतकात इटलीमध्ये कधीतरी बार्टलोमियो ख्रिस्तोफोरी नावाच्या कोण्या संगीतप्रेमीने तयार केलेले हे वाद्य आज त्याच्या देशाच्या सीमा ओलांडून जगभर पसरलं आहे. हिंदी सिनेमातली कित्येक अविट गाणी पियानोवर रचली गेली आहेत. पियानोवर गाणाऱ्या नायकाचा चेहरा आठवला की सर्वात प्रथम कपुर घराणे डोळ्यासमोर येत. 'दोस्त दोस्त ना रहा (राज कपुर), चले थे साथ मिलकर (शशी कपुर), दिलके झरोके मे तुझको बिठाकर (शम्मी कपुर), जीवन के दिन छोटे सही (ऋषी कपुर), ए दिल है मुश्किल (रणबीर कपुर)....!" काही कथानकात तर पियानो कथेचाच एक भाग वाटतो, 'मेरी जंग' मधला अनिल कपुर ज्या पियानोवर 'जिंदगी हर कदम एक नई जंग है' गातो तो पियानोच त्याच्या मुक्या आईची वाचा परत मिळवून देतो. अंधाधुंद मधला आयुषमान खुराणाचा तर सगळा रोलच पियानोवादकाचा.!! ...

शब्द जैसे कल्लोळ

#शब्द_जैसे_कल्लोळ भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट ! पंडित नेहरू आपल्या पहिल्या भाषणाची तयारी करत होते. त्यांच्या सचिवाने त्या भाषणाचा मसुदा त्यांच्यासमोर ठेवला. तो काळजीपुर्वक वाचल्यावर नेहरूंनी त्यातल्या 'Date with destiny'च्या जागी 'Tryst with destiny' हा बदल करायला सांगितले. कारण 'Date'चा एक अर्थ प्रेयसीसोबत भेटीच्या अर्थाने होतो. पण स्वातंत्र्यानंतरचे पहिले भाषण असल्याने त्याचे ऐतिहासिक मोल नेहरूंना ठाऊक होते. देशाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा त्या भाषणातून दाखवायची 'जाण आणि भान' त्यांच्याकडे होत. आज पार्थ पवारांचं पहिलच भाषण नेटकऱ्यांमध्ये ट्रोलिंगचा विषय झालं. असाच अनुभव राहुल गांधींनी अर्णव गोस्वामीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत आला होता. आता ह्यात दोष कोणाला द्यावा? कारण ही मंडळी ज्या पेज थ्री वर्तुळात वावरली आहे त्यांची सर्वसामान्य भारतीयाशी असलेली नाळ कधीच तुटलेली आहे. लहानपणापासून आजूबाजूला वावरणारे लोक एकतर राजघराण्यातले, उद्योगातले, किंवा सहकारसम्राट बिरुद असलेले ! कपिल सिब्बल, शशी थरूर, दिग्विजयसिंग, ज्योतिरादित्...

रांगेतली ती

फार जुनी नाही अगदी अलीकडचीच गोष्ट. अलीकडची म्हणजे जेव्हा मोबाईल आणि माणुस दोघांना बटनांची गरज भासायची आणि दोघांतला फक्त मनुष्यप्राणीच स्मार्ट होता तेव्हाची ही गोष्ट ! त्यावेळी ऑनलाइन फॉर्म सबमिशनच फॅड फारस पसरल नव्हतं. अशाच कोणत्या तरी स्पर्धापरीक्षेच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारिख म्हणून मी धावतपळत पोस्ट ऑफिस गाठलं होत. पोस्टऑफिसच्या एकूणच वातावरणात आनंदीआनंद होता. भल्या मोठ्या रांगेच्या काऊंटर पलीकडच्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर ‘आजही आम्हाला भाव आहे’ असा गुर्मी वजा आनंद होता. ‘उशिरा फॉर्म भरणारे आपणच एकटे वेंधळे नाही,’ असा रांगेतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानी खजिलपणा दिसत होता. बाजुलाच एक समजुतदार वाटणारा नवरा आपल्या भोळ्या वाटणाऱ्या बायकोला ‘साक्षांकन आणि छायांकन’ मधला बेसिक फरक सांगत होता. दुसऱ्या बाजुला एकजण गांधीबाबाच स्टॅम्प तिकीट पाकिटाला लावताना फाळणीचा राग स्टॅम्पवर दणके देत काढत होता. ‘मोफतमे मिले तो जहरभी पिले’ या भारतीयांच्या सवयीला अनुसरून पलीकडच्या टेबलवरील डिंकाची बाटली टेबलवर सांडून सांडून एकरूप झाली होती. अशा आनंददायी वातावरणात मी माझ्या हातातली कागदांची चळत ...

मृत्युंजय

Image
सहावीत असताना कधीतरी शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय' कादंबरी वाचली होती. एखाद्या कथानायकाने किंवा कादंबरीने गारुढ करणे म्हणजे काय असते हे पहिल्यांदा अनुभवलं. महारथी कर्ण हा त्या काळात माझ्यासाठी हिरो झाला होता खरंतर त्या वयातील आकलनशक्ती पाहता मृत्युंजय मधल्या वेगवेगळ्या नावांची सूचीच जास्त आवडली होती. बस्तीक, नाराच, सर्पमूख यासारखी बाणांची नावे किंवा सावंतांनी वापरलेली भाषा शैली मनाला खूप भावली होती. एखाद्या लेखकाला शस्त्र,राजे,वृक्ष यांची इतकी नावे कशी काय पाठ असु शकतात याचं कुतूहल वाटायचे. जस जसं वय वाढलं तस-तसा कर्ण आणखी जवळचा वाटू लागला. मरतेसमयी सोन्याचे दात देखील दान करणारा कर्ण, मैत्रीसाठी जीवन त्यागणारा कर्ण, एकटाच दिग्विजयाला निघणारा, कुमारी भूमीवर अंतिम संस्काराची कामना करणारा कर्ण, खूप आवडला होता. जेव्हा तारुण्यात पदार्पण केलं त्यावेळेस आजूबाजूच्या घटनांमुळे कर्ण अधिक व्यापक वाटू लागला. परशुरामाने त्याला ब्रह्मास्त्र शिकवायला नकार दिला, द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या दिली नाही कारण का? तर तो ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय नव्हता ! कर्णाची गुणवत्ता नाका...

नाझिया हसन - एक शोकांतिका

Image
अवघे ३५ वर्षांचे आयुष्य ! पण एवढ्या छोट्या काळातही ती संगीतविश्वावर विजेसारखी तळपली आणि अंतर्धान पावली. कलेला धर्म, प्रांत, जातीची बंधने नसतात हे वाक्य तस घासून गुळगुळीत झालेलं. पण हे ज्यांनी सार्थ करून दाखवल त्यातली एक गायिका म्हणजे 'नाझिया हसन' ! अगदी कमी वयात तिने पाकिस्तानच्या संगीतक्षेत्रात पदार्पण केले आणि पॉप संगीताची मुहूर्तमेढ रोवुन केवळ पाकिस्तानीच नव्हे तर आशियाई संगीतालाच कलाटणी द्यायला भाग पाडले. बेगम अख्तर, गुलाम अली, मेहंदी हसन या जातकुळीतल्या पाकिस्तानी संगीतासाठी ती एक सांस्कृतिक धक्का होती. ३०-४० वर्षांपूर्वीची पाकिस्तानी जनतेची मानसिकता लक्षात घेता तिच्या प्रागतिक संगीत प्रयोगाची कल्पना येईल. कारण तोवर पुढारलेला म्हणवल्या जाणाऱ्या भारतातही पॉप संगीताची पाळमूळ रुजलेली नव्हती. आपला भाऊ झोएब सोबत तिने एकापेक्षा एक सरस पॉप अल्बम दिले. दिलं बोले बुम बुम, डिस्को दिवाने, 'तेरी मेरी दोस्ती ही गाणी आजही नव्या पिढीला तोंडपाठ आहे. तिच्या अल्बमने विक्रीचा उच्चांक गाठला. मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. नाझिया उच्चविद्याव...

असंतोषाच्या उंबरठ्यावर

'फेसबुक-व्हाट्सएप' एक झाले. 'आयडिया-वोडाफोन' एक झाले, 'झोमॅटो-उबेर इटस' एक झाले, या शतकाच्या सुरुवातीला दखलपात्र नसणाऱ्या किंवा अस्तित्वातच नसणाऱ्या या कंपन्यांनी अल्पावधीत मार्केटमध्ये स्वतःच नाव कमावलं. किंवा नाहीशा झाल्या. गेल्या वीस वर्षांत असे अनेक मर्जर-एक्विजिशन झाले आहेत. वरवर सर्वसाधारण वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. मार्क झुकरबर्ग सारखा तरुण स्वतःची कंपनी सुरू करतो काय आणि पिढ्यानपिढ्या उद्योगात काढलेल्या लोकांना मागे टाकून श्रीमंत लोकांच्या यादीत नाव कमावतो काय हे सगळं विस्मयकारक आहे. केवळ टाटा-बिर्ला नाव ऐकायची सवय असलेल्या भारतीयांनी अंबानी-अदानी नावे घ्यायला कधी सुरुवात केली हेच कळले नाही. एकेकाळी मार्केटवर अधिराज्य गाजवणारे कोडॅक, BSNL, जनरल मोटर्स सारखे दिग्गज मागे पडुन त्या क्षितिजावर नविन नावे दिसु लागली आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट वैगेरे नावे माहीत नसलेली मंडळी आज दुकानात जाण्याचे कष्ट न घेता घरबसल्या ऑफर्स बघून ऑर्डर देत आहेत. इतके एप्स, वेबसाईट झाल्यानंतर सरकारी कार्यालयातुन मनुष्यबळ कमी करा म्हणुन ओरड होत आ...

महानगर

“सर ! केदारनगरला कस जायचं?” शहरातल्या ऐन वर्दळीच्या ठिकाणी एकाने अचानक हातातले एड्रेस कार्ड दाखवत मला प्रश्न विचारला. स्वतःला अस्सल नाशिककर म्हणवणारा मी त्या प्रश्नावर मात्र गोंधळलो. कारण उण्यापुऱ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात अशी वसाहत नाशिकमध्ये आहे हेच माहीत नव्हतं. पुर्वी नाशिकमध्ये पत्ता सांगणं एकदम सोपं काम होत. सैलानी बाबा स्टॉप म्हटलं की जेलरोड, बापु बंगला स्टॉप म्हटलं की इंदिरानगर, डोंगरे वसतिगृह म्हटलं की गंगापुर रोड, आणि त्रिमूर्ती चौक म्हटलं की सिडको ! एवढ्याच भांडवलावर पत्ता सांगितला जाई. गावठाण असेल तर घर नंबरही पुरेसा होता. “स्टॉपवर उतरा, मी घ्यायला येतो” या शब्दात पाहुण्याला थेट घरापर्यंत घेऊन जाण्याइतका पाहुणचार इथे होतो त्यामुळे पाहुण्याला केवळ स्टॉपवर उतरण्याचे कष्ट घ्यावे लागे. पण गेल्या काही वर्षात शहर वाढत चालल आहे. डिजीपीनगर दोघांपैकी कोणतं? शिवाजीनगर दोघापैकी कोणतं? हे ध्यानी ठेवावं लागतं. मविप्र संस्थेच्या कॅम्पसला ‘शिवाजीनगर’ म्हणतात हे नविन बारसं फार उशिरा कळाल. बापु ब्रिजला बापु ब्रिज म्हणायच नाही ही तंबी ऐकावी लागते. सीसीएमचा लॉंगफॉर्म काय? हे विचा...

बॉलीवुडची देशभक्ती

Image
26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला मला अलार्म लावून उठायची गरज कधीच पडली नाही कारण ते काम मनोजकुमारचे चित्रपट गल्लीत मोठ्या आवाजात लावलेल्या म्युजिक सिस्टीमद्वारे करत असत. मंडपात आलेल्या वधू वरासाठी "बहारो फुल बरसाओ" हे जस mandatary song आहे तस देशभक्तीपर सकाळ ही महेंद्र कपुरांच्या आवाजात "आ आ आ आ मेरे देश की धरती"ने होते. तीच जर शिवजयंती असली की सकाळ "प्रतापगडच्या पायथ्याशी खान आ आ आ आ" अशी होतें (दोन्ही आलापातील सुरावट वेगळी आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी). तर सांगायचा मुद्दा हा की बॉलीवूड आणि देशभक्ती ह्यांचे अतूट नाते आहे. विदेशी ताकदके देशको मिटानेके नापाक इरादे ध्वस्त करण्यासाठी अमिताभ ते अक्की अशा बऱ्याच जणांनी यथाशक्ती योगदान दिले आहे. इंग्रज भारत सोडून जाताना पाठीमागे चहा, क्रिकेट, थँक यु, सॉरी, टॉम अल्टर…! असा बराच ऐवज सोडून गेले होते. टॉम अल्टर हा दीर्घकाळ विदेशी हुकूमतचा प्रतिनिधी होता. पुढे शक्तिमान आणि कॅप्टन व्योमने त्याला गुरू मानल्यामुळे आम्ही त्याचा राग धरणे सोडून दिले. त्याचाच दुसरा भाऊबंद म्हणजे बॉब ख्रिस्टो ! मिस्टर इंडियाने त्याला ...