In Nolan we trust
कॉलेजच्या दिवसात मित्रांची रूम म्हणजे आमच्यासाठी मिनी थिएटर होत ! '
शिंडलर्स लिस्ट' सारखा All time classic असो अथवा 'द अंग्रेज' सारखा छपरी हैद्राबादी सिनेमा, आमच्या रसिकतेला कशाचेही वावडं नव्हतं ! कधी कधी लॅपटॉपवर 'शोले' लावून सर्वजण एकासुरात त्याचे पाठ झालेले संवाद म्हणायचो ! अशातच एके दिवशी मित्राने त्याच्या हॉलिवूड फोल्डरमधला 'मेमेंटो' दाखवला !
पहिली रिएक्शन होती की 'हे काय चाललंय बे!'
पण नंतर जाणवलं की असे काही out of the track बघायची सवय नव्हती !
ख्रिस्तोफर नोलान हे नावं पहिल्यादा ऐकलं ते त्या चित्रपटाच्या निमित्ताने !
पुढे नोलानच्या चित्रपटांनी मनावर एक गारुढच केलं !
इंटरस्टेलर ,इन्सेप्शन, अशा एकापेक्षा एक भन्नाट कलाकृती त्याने सादर केल्या, पण त्यामध्ये हॉलिवूडच्या परंपरेत बसणारा सवंगपणा, अश्लीलपणा अजिबात नव्हता ! कथा ह्या शक्यतो sci fi स्वरूपातल्या असल्या तरी विज्ञानाने आणलेले माणुसकीशून्य चित्रण त्यात नव्हते !
स्मृती, अंतर्मन, कृष्णविवर अशा अफलातून आणि मति गुंग करणाऱ्या कथा रंगवताना त्याने केलेले स्क्रिप्ट रायटिंग हे अभ्यासाचा विषय होईल !
इंसेप्शन मधील आपल्या मुलांच्या भेटीसाठी व्याकुळ असलेला पिता किंवा इंटरस्टेलर मधला मुलीला दिलेल्या वचनाखातर परतणारा अवकाशयात्री पिता ! नोलांनने मानवी भावना व तंत्रज्ञान ह्यांचा सुरेख मेळ घातला आहे !
बॅटमॅनचे तुरूंगातून पळून जाणे किंवा क्लायमॅक्सला त्याचे ओझरते दर्शन जे रोमांच आणते त्याला तोड नाही ! खरतर एवढा प्रतिभावान दिगदर्शक अजून ऑस्कर पासून वंचित राहिला हे नवल आहे ! पण हॉलिवूडच्या इतिहासाकडे नजर टाकली तरी ब्रॅड पिट, जॉनी डेप, अशी अनेक मंडळी किंवा आल्फ्रेड हिचकॉक सारखे महान दिग्दर्शक देखील उपेक्षित राहिल्याने त्यात नवल नाही !
स्टीफन स्पिलबर्ग नंतर कदाचित सिनेसृष्टीला हाच एक महान दिग्दर्शक लाभला असावा !
साय-फाय सिनेमे केल्या नंतर नोलांन आता सत्यघटनेवर आधारित असलेला डंकर्क घेऊन येत आहे. ह्या वेळेस पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धावर आधारित असल्याने पाहणे उतकंठावर्धक असेल !
@सौरभ_रत्नपारखी
Comments