Posts

Showing posts from February, 2019

MPSC

#MPSC ६९ जागांसाठी २००००० अर्ज ! ही आकडेवारी खुप भयावह वाटणारी आहे. आज वृत्तपत्रात स्पर्धा परीक्षांचे भयानक वास्तव वाचले. शासकीय पदांच्या जाहिराती लवकर सुटत नाही, मग सुटल्याच तर दीर्घकाळ चालणारी भरती प्रक्रिया, परत कोणीतरी स्टे आणला की होणारी फरपट, न परवडणारी परीक्षा फी, काळासोबत बदलणारे पॅटर्न, उमेदीचा वाया जाणारा काळ, वाढणाऱ्या शिक्षणसंस्थांची स्पर्धा, स्टडी सर्कलच्या पुस्तकांची पारायणे, तरीपण धीर सुटत नाही कारण व्हाट्सअप-फेसबूकवर पाहिलेले नागरे पाटील- बानूगडे पाटील ह्यांची प्रेरक दिवास्वप्ने दाखवणारी भाषणे....!! हे भयाण  चित्र आहे.

सिंगलता

'काही लोक इतके सिंगल असतात की........!!!!' असा विनोद असलेले मेसेज मी शक्यतो फॉरवर्ड करीत नाही. कारण व्हाट्सअप पसरलेल्या ग्रुप्सच्या जाळ्यात अनेक मित्र सिंगल आहेत, पण हा विषय खरंच हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? कुंडलीदोष, प्रापंचिक अडचणी, निराधारता, फसवणूक या व इतर अनेक कारणातून आलेले एकाकीपण खुप वाईट असते. अनाथ असल्यामुळे जाती-धर्माचा पता नसलेले किंवा काका-मामांच्यावर अवलंबून असलेले सुद्धा काहीजण आहेत. कमी वयात जोडीदाराचा मृत्यू व त्यातून आलेले सिंगलपण तितकेच वाईट ! आपल्या लहान भावाबहिणींच्या लग्नाखातर किंवा देशसेवेसाठी आणि समाजकार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून सिंगलत्व स्वीकारणारे पण खूप आहेत. आपल्या अपंगत्वाचे ओझे कोणावरही येऊ नये म्हणून लग्न न करणारे देखील बरेच जण मित्रयादीत आहेत. काहीजण यशस्वी शेतकरी किंवा दुकानदार पण आहेत तरी मुलीचे वडील शासकीय नोकरीला प्राधान्य देत आहेत. नोकरी मिळत नसल्याने हताश झालेले व त्या आर्थिक स्थैर्याअभावी लग्न टाळणारे पण आहेत. घरातीलच एखाद्या शुल्लक वादावरून जातीबाह्य केलेले कुटूंबीय याकाळात देखील आहेत. कुटूंबात आनुवंशिक आजार असेल तर पुढच