मी पाहिलेले सिनेमे
"गॅंग ऑफ वासिपुर" सिनेमातला रामाधिर एका प्रसंगात वैतागून म्हणतो की "साला जबतक हिंदुस्थानमे सनिमा है, लोग #&@#& बनते रहेंगे !" आजकाल म्युजिकली, टिक टॉक वरचे व्हिडिओ बघून रामाधिरच्या म्हणण्यात तथ्य होत हेच दिसून येत. खरतर सिनेमा बनवणे ही खूप सुंदर कला आहे, एकाअर्थी अनेक कलांचा समुच्चय आहे. या कलेच्या प्रेमापायी आयुष्यातला एक मोठा कालखंड अजिबोगरिब सिनेमे पाहण्यात घालवला. आरती छाब्रिया, किम शर्मा, पायल रोहतगी, सोनल चौहान, शमिता शेट्टी, सायली भगत इत्यादी नावाच्या नायिका पडद्यावर वावरत होत्या तेव्हाचा तो काळ होता. ह्यांच्या जोडीला अभिनेते म्हणून जॅकी भगनानी, आर्य बब्बर, नकुल कपुर, हरमन बावेजा वैगेरे नरपुंगव प्रति-हृतिक बनण्यासाठी बॉलिवुडात आले होते. पण दरम्यान हृतिकच्या मागेच पनवती लागल्यावर ह्यांना कोण विचारणार ?! "Darling" नावाचा एक भुतपट ज्यामध्ये फरदिन खान - ईशा देओल जोडी होती हा सिनेमा मल्टिप्लेक्स मध्ये पाहण्याईतक मनाचं मोठेपण माझ्यात होत. दुसऱ्या एका "हिरोज" नावाच्या सिनेमात सोहेल खान - वत्सल सेठ हे नायक होते. चांगल्या कथेची माती ...