Posts

Showing posts from January, 2020

महानगर

“सर ! केदारनगरला कस जायचं?” शहरातल्या ऐन वर्दळीच्या ठिकाणी एकाने अचानक हातातले एड्रेस कार्ड दाखवत मला प्रश्न विचारला. स्वतःला अस्सल नाशिककर म्हणवणारा मी त्या प्रश्नावर मात्र गोंधळलो. कारण उण्यापुऱ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात अशी वसाहत नाशिकमध्ये आहे हेच माहीत नव्हतं. पुर्वी नाशिकमध्ये पत्ता सांगणं एकदम सोपं काम होत. सैलानी बाबा स्टॉप म्हटलं की जेलरोड, बापु बंगला स्टॉप म्हटलं की इंदिरानगर, डोंगरे वसतिगृह म्हटलं की गंगापुर रोड, आणि त्रिमूर्ती चौक म्हटलं की सिडको ! एवढ्याच भांडवलावर पत्ता सांगितला जाई. गावठाण असेल तर घर नंबरही पुरेसा होता. “स्टॉपवर उतरा, मी घ्यायला येतो” या शब्दात पाहुण्याला थेट घरापर्यंत घेऊन जाण्याइतका पाहुणचार इथे होतो त्यामुळे पाहुण्याला केवळ स्टॉपवर उतरण्याचे कष्ट घ्यावे लागे. पण गेल्या काही वर्षात शहर वाढत चालल आहे. डिजीपीनगर दोघांपैकी कोणतं? शिवाजीनगर दोघापैकी कोणतं? हे ध्यानी ठेवावं लागतं. मविप्र संस्थेच्या कॅम्पसला ‘शिवाजीनगर’ म्हणतात हे नविन बारसं फार उशिरा कळाल. बापु ब्रिजला बापु ब्रिज म्हणायच नाही ही तंबी ऐकावी लागते. सीसीएमचा लॉंगफॉर्म काय? हे विचा

बॉलीवुडची देशभक्ती

Image
26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला मला अलार्म लावून उठायची गरज कधीच पडली नाही कारण ते काम मनोजकुमारचे चित्रपट गल्लीत मोठ्या आवाजात लावलेल्या म्युजिक सिस्टीमद्वारे करत असत. मंडपात आलेल्या वधू वरासाठी "बहारो फुल बरसाओ" हे जस mandatary song आहे तस देशभक्तीपर सकाळ ही महेंद्र कपुरांच्या आवाजात "आ आ आ आ मेरे देश की धरती"ने होते. तीच जर शिवजयंती असली की सकाळ "प्रतापगडच्या पायथ्याशी खान आ आ आ आ" अशी होतें (दोन्ही आलापातील सुरावट वेगळी आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी). तर सांगायचा मुद्दा हा की बॉलीवूड आणि देशभक्ती ह्यांचे अतूट नाते आहे. विदेशी ताकदके देशको मिटानेके नापाक इरादे ध्वस्त करण्यासाठी अमिताभ ते अक्की अशा बऱ्याच जणांनी यथाशक्ती योगदान दिले आहे. इंग्रज भारत सोडून जाताना पाठीमागे चहा, क्रिकेट, थँक यु, सॉरी, टॉम अल्टर…! असा बराच ऐवज सोडून गेले होते. टॉम अल्टर हा दीर्घकाळ विदेशी हुकूमतचा प्रतिनिधी होता. पुढे शक्तिमान आणि कॅप्टन व्योमने त्याला गुरू मानल्यामुळे आम्ही त्याचा राग धरणे सोडून दिले. त्याचाच दुसरा भाऊबंद म्हणजे बॉब ख्रिस्टो ! मिस्टर इंडियाने त्याला &#

झुंज

'दोघांची झुंज लावून मजा पाहणे' हि मानवजातीची जुनी परंपरा आहे. कोंबड्यांपासून ग्लॅडिएटर पर्यँत झुंजीचे अनेक प्रकार व रक्तपात पाहिले गेले आहेत. सध्या ह्यामध्ये 'वैचारिक झुंज' लावणाऱ्या लोकांचा नवा पंथ उदयास आला आहे. भारतात प्रत्येक जाती-धर्मात महापुरुषांची कमतरता नाहीच त्यामुळे फेसबुक-व्हाट्सअपवर 'तुमचा महापुरुष श्रेष्ठ कि आमचा?' अशी वर्गवारी करून पोस्ट करायची. आणि ह्यावर समोरचा डिवचला गेला कि तो आणखी काही लोकांना टॅग किंवा ऍड करून मदतीला बोलवतो. मग बाबा आदमच्या जमान्यात घडलेल्या कोणत्या तरी घटनेचा किंवा वक्तव्याचा पुरावा अथवा स्क्रीनशॉट म्हणून फोटो टाकला जातो. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे व्हाट्सअप इतिहासकार मग दोन चार फॉरवर्ड झालेल्या मेसेजच्या जीवावर समोरच्याला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात कारण अशा लोकांनी वाचनालयात जाऊन कधी पुस्तके चाळली असतील ह्याची सुतराम शक्यता नसते. अमक्या महापुरुषाने 40 लढाया जिंकल्या म्हटले की दुसऱ्याच्या नावावर 200 लढाया जिंकल्याची थाप मारली जाते. त्या महापुरुषाने आयुष्यात कधीही न जिंकलेल्या लढाया त्याच्या नावावर खपवल्या जातात

10 Years Challenge

सध्या फेसबुकवर 10 years challengeचा trend सुरू आहे. असा एखादा trend आला की माझ्यासारख्या Nostalgia मध्ये जगणाऱ्यांना उधाण येत. खरतर हा trend फेसबुकवर वेगळ्या स्वरूपात चालूच होता. कधी ‘If you remember this’ तर कधी ‘Only 90’s kids will know this’ च्या रूपाने ते समोर येतच होत. दरदिवशी ‘On this day' च नोटिफिकेशन पण झळकत असत. या ओघात एकदा मी #तिशीपारचे_आम्ही ही पोस्ट पण लिहिली. दहा वर्षे हा फार मोठा काळ असतो. २००७ च्या सुमारास अमेरिकेत आर्थिक मंदी सुरू झाली होती. 9/11ला वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळल्यानंतर अमेरिकेने जी आर्थिक धोरणे राबवली. त्यांचे दुष्परिणाम दिसू लागले होते. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर cost cutting केली. रोजगाराच्या फार संधी हिरावल्या गेल्या. २००७ नंतर रोजगाराची स्पर्धा तीव्र होत गेली. सरकारने भरमसाठ इंजिनियरिंग कॉलेजेसला मान्यता दिल्या पण त्या प्रमाणात कंपन्या तयार न झाल्याने मिळेल त्या नोकरीत आणि पगारात इंजिनियर्स काम करू लागले. एकूणच त्या सर्व अभ्यासक्रमाचेच अवमूल्यन झाले. शालांत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी आत्महत्या करतात म्हणून खिरापतीसारखे गुणवाटप सु

तिशीपारचे आम्ही

खरतर हे आत्मचरित्र लिहायचं वय नाही, पण काल उद्धव साहेबांना अयोध्येत महाआरती करताना पाहिलं वाटलं की काळाच एक आवर्तन पुर्ण होतंय. जेव्हा ह्या जगात आलो व थोडफार समजु लागलं तेव्हा टीव्हीवर रामायण मालिका चालू होती. नंतर तिची जागा महाभारतने घेतली. टीव्ही बघायचं आणि जत्रेतील धनुष्यबाण आणून खेळायचं ते वय होत. बाहेरच्या जगात मंडल/कमंडलच राजकारण चालू होतं ते कळत नव्हतं. पुढे राजीव गांधी स्फोटात मारले गेल्याची बातमी म्हणजे आजच्या भाषेत ब्रेकिंग न्युज पाहिल्याचं आठवत. शाळेत जाऊ लागलो तेव्हा देश माझ्यासोबतच उदारीकरणाच्या दिशेने जाऊ लागला होता. लिहिता- वाचता येऊ लागल्याचा आनंद होता. नाशिकच्या कुंभमेळ्यात शहरातील भिंतीवर लिहिलेले 'मंदिर वही बनाएंगे'चे नारे वाचत घरी परत यायचो. पुढे वातावरण बदलत गेलं. शाळेला अचानक सुट्टी मिळाली होती. देशात काहीतरी घडलं होत. रस्त्यावर एखादी बॅग पडली असेल तर उचलत जाऊ नको असं घरातले सांगायचे कारण स्फोट होतो. एकदा घरी भल्या पहाटे उठवलं गेलं किल्लारीला भुकंप झाला होता. टीव्हीवर ते दृश्य पुन्हापुन्हा दाखवत होते. तेव्हा अलिफ लैला, चंद्रकांता बघायला आवडत होत. ज

नवचैतन्याची दोन दशके

Image
जवळपास वीस वर्षांपुर्वी सर्व मराठी मुलखात चैतन्याच एक नविन वादळ आलं होतं, अल्फा मराठीच्या रूपाने !! झी एंटरटेनमेंटसारख्या माध्यमक्षेत्रातील मोठया समुहाने पहिली मराठी खासगी मनोरंजन वाहिनी सुरू केली होती. त्यापुर्वी बरीच वर्षे मराठी जनमानसात एक मरगळ निर्माण झाली होती. संध्याकाळी 'दामिनी', रविवारी लक्ष्या-अशोकचे तेच चित्रपट पुन्हा पाहून चौकटीत अडकलेल्या मराठी प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसला होता. दरम्यान मराठी चित्रपट आणि नाटके ह्यांच्यात पण ती मरगळ जाणवत होती. नविन प्रयोग, नविन कलावंत, नविन कथांचा दुष्काळ पडला होता. पण अल्फा मराठीच्या झंझावातात हे रूप पालटलं. सुरुवातीला नायक, प्रपंच, पिंपळपान, हसा चकटफु, अशा एकेक मालिका करत असताना त्यांचा परीघ वाढत गेला. आभाळमाया, वादळवाट ह्या मालिकांनी लोकप्रियतेचे मापदंड रचले. घडलंय-बिघडलंय सारख्या कार्यक्रमानी वगनाट्य, प्रहसनातील मराठी विनोदाला नव्या ढंगात लोकांसमोर आणले. 'नक्षत्रांचे देणे'च्या रूपाने मराठी कवी, गीतकार, साहित्यिकांच कर्तृत्व पुन्हा नव्या पिढीसमोर आलं. 'अल्फा गौरव'च्या रूपाने तयार झालेल्या स्पर्धात्मक वाताव

आजीबाईंचा सिनेमा

Image
'लव्हके लिए कुछभी करेगा' या सिनेमात आज कपुर (स्नेहल दाबी) नावाच एक पात्र आहे. बॉलिवूडमध्ये हिरो बनण्याची इच्छा असलेल्या अस्लमभाईला (जॉनी लिव्हर) तो बड्या बड्या बाता मारून लुबाडतो. आपले फिल्म इंडस्ट्रीत किती घनिष्ठ संबंध आहेत हे तो ज्या पद्धतीने जॉनी लिव्हरला सांगतो ते सीन पाहण्यासारखे आहे. हसून हसून पुरेवाट होते. हा सिनेमा पाहताना मला आमच्या आजीची आठवण येते. एकदा ती जुन्या आठवणीत रमली की, फिल्म इंडस्ट्रीची मोठं मोठी नावे सहज बोलून जायची. तिचं बालपण जुन्या नाशिकमध्ये गेलं होतं. तसा चित्रपटांचा आणि तिचा काही संबंध नव्हता, पण दादासाहेब फाळकेंच्या सोबत काम केलेली काही मंडळी नित्य परिचयाची होती. आजी सहज बोलून जायची की आम्ही खेळता खेळता फाळकेंच्या स्टुडिओमध्ये चक्कर मारून यायचो आणि तिथे हरिश्चंद्र, तारामती वैगेरे पात्रांच्या वेशभूषेतील काही हार किंवा त्यांचे मणी सापडले की ते घरी कुतूहलाने घेऊन यायचो. (आजीच्या वयाचा हिशोब लावला तर कुठेच ताळमेळ लागत नसायचा), पण ती म्हणायची त्यात थोडेफार तथ्य असायचे कारण आमच्या जवळच दादासाहेब फाळकेंचा स्टुडिओ होता. पण वयोमानानुसार तिने चुकीचा चित्र

Sad party songs

Image
पार्टी रंगात आलेली असते. नायक, नायिका, सहाय्यक अभिनेता, खलनायक...! सगळेच पार्टीमध्ये 'भरी मैफिलमे मौजुद' असतात. पण नायक-नायिकेच्या नात्यात काहीतरी बिनसलेलं असत. एकमेकांपासून नजरा चुकवत म्हणा किंवा मिळवत म्हणा, आपला पडिक चेहरा घेऊन त्या उत्साही वातावरणावर विरजण टाकायचे काम ते इमानेइतबारे करत असतात. अचानक नायकाच्या हितचिंतकाला काय अवदसा आठवते माहीत नाही पण तो माईक नायकाच्या हातात देऊन त्याला गाण्याचा म्हणजे मैफिलको चार चांद लगाण्याचा आग्रह करतो, अन मग हिरोपण आपल्या दिलाच्या दर्दाला सुरोमे बांधकर पेश करतो. दरम्यान नायिकेचा बाप त्याच्या कोण्या मित्राच्या दोस्तीला रिश्तेदारीमध्ये तबदिल करायची अनाउंसमेंट करून बसलेला असतो. पडद्यावर राहुल रॉय, आमिर खान पासून अजय देवगणपर्यत अनेकांनी अशी गाणी 90s मध्ये साकारली आहे. दीपक तिजोरी, टिकू तलसानिया, सदाशिव अमरापूरकर अशा अनेकांनी नायकाला ऐन ढासळत्या क्षणी गात केलं होतं. छुपानाभी नही आता (बाजिगर) ए काश कही ऐसा होता (मोहरा) मै दुनिया भुला दुगा (आशिकी) इस तरह आशिकीका असर छोड जाऊंगा (इम्तिहान) *तु प्यार है किसीं और का (दिल हे के मानता नही) जिता

चित्रपट

Image
'चित्रपट बनवणे' ही जशी एक कला आहे, तशीच 'चित्रपट पाहणे' ही पण एक कला आहे. उदा. 'लगान'मध्ये मॅचच्या पहिल्या दिवशी कचराचा बॉल वळत नाही, पण दुसऱ्या दिवशी अचानक वळतो. हा सीन समझण्यासाठी निदान क्रिकेटच मुलभूत ज्ञान असावं लागतं तर खरी गंमत कळते. 'इकबाल'मध्ये नसिरुद्दीन शाह गंमतीत एक डायलॉग म्हणतो की "वक्तकी दिमकने आजभी मेरे बाजुओको कोखला नही किया"!! हा डायलॉग 'शोले'मधील संदर्भाला अनुसरून आहे, हे समझण्यासाठी तुम्ही कट्टर सिनेप्रेमी असणे आवश्यक आहे. सिनेमा पहावा तर थिएटरमध्येच ! या सनातनी विचारांचा मी आहे. घरातला LCD कितीही इंची स्क्रीनचा असो तो सिनेमाचा खरा आनंद देऊ शकत नाही. नाहीतर 'खिलाडी'मध्ये आयेशा झुल्का जीव खात सर्व हॉस्टेलमध्ये पळत आहे आणि खुनी कोण हे रहस्य उलगडणार तोच 'मॅगी नूडल्स' किंवा 'उजाला सफेदी'ची जाहिरात लागणे हा त्या कलेचा अवमान आहे असे मी मानतो. एकदा घरात टीव्हीवर 'गुप्त'चालू होता, तोच काकु येऊन म्हणाल्या "हा तोच पिक्चर आहेना रे ज्यात शेवटी कळत की .......च खुनी आहे?" (माझी नजरही आग

जिंदगी मिलेगी ना दोबारा

Image
"जिंदगी ना मिलेगी दोबारा" - एक संस्मरणीय रोड ट्रिप 'फरहान अख्तर आणि झोया अख्तर' ही बॉलीवूडमधील जशी दोन भावंडे आहेत तसे त्यांनी दिग्दर्शीत केलेले 'दिलं चाहता है' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे सिनेमे पण भावंडे आहेत. तीनं तऱ्हेचे तीन मित्र आणि त्यांच्या तीन वाटा, ह्या थीमवर दोन्ही सिनेमे उभे राहिलेत तरीही दोन्हीकडच्या कथावस्तू वेगवेगळ्या होत्या. कबीर (अभय देओल) , अर्जुन (ऋतिक रोशन) आणि इम्रान (फरहान अख्तर) ह्या तिघांची ही कथा !! कबीरच लवकरच नताशाशी (कल्की कोएलचीन) लग्न होणार आहे. पण लग्नाआधी त्याला आपल्या जुन्या मित्रांसोबत 'बॅचलर रोड ट्रिप'वर जायच आहे. बर, ही ट्रिप साधीसुधी नसुन युरोपात स्पेनला काढायची आहे व त्यातही गंमत म्हणजे तिघांनी ठरवलेल्या एकेक एडव्हेंचर स्पोर्टमध्ये इतर प्रत्येकाने सहभागी व्हायच आहे. ही आखणी त्यांनी फार पुर्वी केलेली असते पण मधल्या काळात तिघांच्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या असतात. अखेर ही ट्रिप सुरू होते. सतत कामात दंगलेला अर्जुन, खट्याळ अन मिश्किल स्वभावाचा इम्रान आणि आपल्या भावी पत्नीच्या दडपणाखाली असलेला कबीर अ

इडियटपणाची दहा वर्षे

Image
या ख्रिसमसला '3 इडियट्स' रिलीज होऊन दहा वर्षे झाली. गेले एक दशक हा सिनेमा स्वतःच 'कल्ट स्टेटस' आणि 'फॅन फॉलोविंग' टिकवून आहे. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा माझं स्वतःच आयुष्य फरहान कुरेशी - राजु रस्तोगी ह्या दोन पात्रांच्या मध्ये हिंदोळे खात होत. कारण त्यांच्याप्रमाणे मी देखिल मॅकेनिकल इंजिनियरिंगला होतो आणि डिप्लोमा/डिग्री/ड्रॉप अशी प्रदीर्घ 3D कारकिर्द झाली होती. त्यामुळे कधी एकदा या दलदलीतुन बाहेर पडतो अस झालं होतं, आणि अशातच 3 इडियट्स पाहिला....फर्स्ट डे फर्स्ट शो !! मशीनची व्याख्या, परीक्षेच टेंशन, लास्ट इयरचा प्रोजेक्ट, हातात अंगठ्या घालणे, हे सगळं अनुभवत होतोच पण चित्रपटाने त्या भावना बोलक्या केल्या. त्या सुमारास दिल्ली व जवळपासच्या परिसरात 20 दिवसात 300 आत्महत्या झाल्या होत्या त्यातल्या बहुतेक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या होत्या....रँचोच्या भाषेत 'वो सुसाईड नही था, मर्डर था...यह इंजिनियरभी कमालके होते है, ऐसा कोई मशीनही नही बनाया जो दिमागके अंदरका प्रेशर नाप सके' एकूणच दारुण परिस्थिती होती. पण '3 इडियट्स' रिलीज झाला आणि ह्यात कमालीच

विरक्त होताना

Image
जवळपास 20 वर्षांपूर्वी SSC संपवुन कॉलेजच्या विश्वात पदार्पण केल होत. दोन दशके उलटली त्याला !!! आयुष्य मजेत चालू होतं. शहरात मल्टीप्लेक्स नव्याने सूरु झाले होते., मॉल उभे राहिले होते, कॉलसेंटर मध्ये काम करणाऱ्या मित्रांच्या हातात पैसा खेळू लागला होता, ऑर्कुटमुळे जग एका क्लिकवर समोर आलं होतं. आयटी सेकटरमुळे सगळ्यांना कमी वयात जास्त पैसे मिळू लागले होते. पण या सर्वात कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं, काहीतरी हरवल होत. मन:शांती, सुकून, स्वत्व....!! असोका मधला चंडअशोक आठवतो का? सगळ काही जिंकून अखेरीस विरक्त होतो. स्वदेसचा मोहन भार्गव नासाची नोकरी सोडून चरणपुर गावात परत येतो. "बाप का पैसा है, पडे पडे सड जाता है" म्हणणाऱ्या रंग दे बसंती मधल्या करणला अचानक एका क्षणी 'रूबरु रोशनी'चा साक्षात्कार होतो. अंगावर पोलिसांच्या लाठ्याकाठ्या पडताना सुद्धा हाताच्या मुठी आवळून बसून राहतो. 3 इडियट्समधला फुंसुक 'मै कहा गई और तुम कहा रह गई', ह्या चतुरच्या डिवचण्याला दाद न देता लद्दाखमध्ये लहानग्या मुलांची शाळा चालवतो. टॅक्सी नं 9211 मध्ये एक टॅक्सी चालक तर दुसरा बिझनेसमनचा

बीस साल बाद

Image
नविन वर्ष सुरू झाल्यापासुन मला गत 20 वर्षाच अवलोकन करायचं वेड लागलंय. कारण एकविसाव्या शतकात पाय ठेवल्यानंतर आपण काय काय कमावलं किंवा गमावलं हे समझण्यासाठी फिल्मी स्टाइलप्रमाणे 'बीस साल बाद' नित्कर्ष काढणे योग्य ठरेल. गेल्या वीस वर्षांत मॉल,मल्टीप्लेक्स संस्कृती आणि मोबाईल युग झपाट्याने वाढल. रिएलटी शो मुळे गल्लोगल्ली एखादा सेलिब्रिटी सापडू लागला. मला आठवतंय की 'कहो ना प्यार है' हा शेवटचा सिनेमा होता ज्याच तिकीट ब्लॅकने खरेदी केल होत. त्यावेळी 'ऋतिक मॅनिया' लिहिलेल्या वह्या आवर्जुन खरेदी करायचो. कोणताही डान्स शो असो 'टिडिंग टिडिंग'च्या म्युजिकवर 'एक पल का जीना' म्हणणारा ऋतिक फॅन असायचाच. गेल्या वीस वर्षांत एवढी अफाट लोकप्रियता इतर कोणाच्या वाटेला आलेली पाहिली नाही. ऋतिक हा एका अर्थाने शेवटचा सुपरस्टार होता. पुढच्या अनेकांचे स्टारडम चित्रपटासह कमी जास्त होत गेले. एकेका थिएटरमध्ये 25-50 आठवडे मुक्काम करणारे सिनेमे आता आढळून येतात का? दिवसाला इतक्या स्क्रीनवर शो त्यात परत मोबाईल पायरसी मुळे तेही संपुष्टात आल आहे. जितेंद्र-जया प्रदा ह्यांचा र

अदालत की कारवाई

Image
अदालत की कारवाई 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये' असं म्हणतात, या वाक्याशी मी खुप सहमत आहे. कारण कोर्टात गेल्यानंतर आपला जो अपेक्षाभंग होतो तो आपण वेड्यात निघालोय अशी खात्री करून देणारा असतो. आता ह्याचा संबंध कोणत्याही खटल्याशी नसुन बॉलिवूडशी आहे. सर्वसाधारण भारतीयाला लहानपणापासुन कायद्याच शिक्षण मिळत ते बॉलिवूडच्या सिनेमातून, बाकी त्याचा आणि 'बार'चा संबंध कधी येत नाही (इथे 'बार' म्हणजे वकिलांच बार, तुम्हाला अपेक्षित असलेला बार नाही). सिनेमे पाहून पाहून दफा 302, दफा 420 म्हणजे काय हे एव्हाना कळू लागलंय तरी काही प्रश्न अनुत्तरित राहिलेत. 'सच्चा-झूटा' सिनेमात जशी कुत्र्याने भुंकून साक्ष दिली की खटल्याचा निकाल लागतो तस वास्तव आयुष्यात घडत का? 'दामिनी'मध्ये पुढची तारिख देणारा जज जो निकाल लगेच देतो तो मीनाक्षी शेषाद्रीचा डायलॉग ऐकून देतो, की सनी देओलच्या डरकाळीला घाबरून देतो? 'मेरी जंग'मध्ये अनिल कपूर जशी विषाची बाटली खोटी आहे हे दाखवण्यासाठी रिचवतो तस वास्तव आयुष्यात होत का? 'क्युकी मै झूट नही बोलता' मध्ये गोविंदा स्वतःला

गुरू (2007)

Image
गुरू (2007) कदाचित मी चुकत असेल पण राहुल द्रविड आणि अभिषेक बच्चन ह्यांच्यात मला फार साम्य वाटत. दोघांचेही पदार्पण दुसऱ्या स्टार परफॉर्मरपुढे झाकोळल गेलं (सौरभ गांगुली आणि ऋतिक रोशन) ! द्रविड जसा कारकिर्दभर दबावाखाली खेळी खेळत राहिला तसा कर्तृत्ववान आई-बाप आणि पत्नी ह्यांच्या कर्तृत्वाच्या दबावाखाली अभिषेकही ट्रोल होत राहिला. एक्शन, कॉमेडी, रोमँटिक, गॅंगस्टरपट करूनही त्याला हवा तो ड्यु मिळाला नाही जस द्रविडच झालं. तरी द्रविडच्या काही खेळी जशा गाजल्या तशा युवा, गुरू, रावण, सरकार मधला त्याचा अभिनय निश्चितच वाखाणण्याजागा होता. 2007 च्या मनिरत्नम दिग्दर्शीत 'गुरू'ने खऱ्या अर्थाने त्याच्यातल्या अभिनेत्याला न्याय दिला. ह्या सिनेमाच कथानक खुपस धीरूभाई अंबानींच्या आयुष्यावर बेतलेल.!! गुजरातच्या एका छोट्या खेड्यातील तरुण गुरुकांत देसाई (अभिषेक बच्चन) आयुष्यात यशस्वी होण्याच स्वप्न पाहतो पण त्याचे शिक्षकीपेशातील मध्यमवर्गीय वडिल (राजेंद्र गुप्ता) त्याला वास्तवात न येणारी स्वप्ने न पाहण्याचा सल्ला देतात. पण गुरू महत्वाकांक्षी असतो टर्कीमध्ये नोकरीला गेलेला गुरू मोठा व्यावसायिक होण्

Australian bushfire

Image
ब्राझिल असो वा ऑस्ट्रेलिया !! हे अग्नितांडव सर्व मानवजातीला एक दिवस खुप महाग पडणार आहे. लक्षावधी जीव-जंतू जळून राख झाले आहेत. ही पृथ्वी फक्त मानवजातीला आंदण दिलेली नाही. पृथ्वीवर राज्य करणारा महाकाय डायनोसॉर पण काळाच्या ओघात संपला तिथे तुमची आमची काय बिशाद ! जितके खांडववन तुम्ही तुमचे इंद्रप्रस्थ बनवण्यासाठी जाळाल, तितक्या वेळ महाभारत आणि यादवीकडे एक पाऊल पुढे टाकाल !! निरपराध मुक्या जीवांचे शाप भोवतीलच !! सृष्टीचे नियम सृष्टीकर्त्याला पण लागू होतात. अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा !!!

मी पाहिलेले सिनेमे

"गॅंग ऑफ वासिपुर" सिनेमातला रामाधिर एका प्रसंगात वैतागून म्हणतो की "साला जबतक हिंदुस्थानमे सनिमा है, लोग #&@#& बनते रहेंगे !" आजकाल म्युजिकली, टिक टॉक वरचे व्हिडिओ बघून रामाधिरच्या म्हणण्यात तथ्य होत हेच दिसून येत. खरतर सिनेमा बनवणे ही खूप सुंदर कला आहे, एकाअर्थी अनेक कलांचा समुच्चय आहे. या कलेच्या प्रेमापायी आयुष्यातला एक मोठा कालखंड अजिबोगरिब सिनेमे पाहण्यात घालवला. आरती छाब्रिया, किम शर्मा, पायल रोहतगी, सोनल चौहान, शमिता शेट्टी, सायली भगत इत्यादी नावाच्या नायिका पडद्यावर वावरत होत्या तेव्हाचा तो काळ होता. ह्यांच्या जोडीला अभिनेते म्हणून जॅकी भगनानी, आर्य बब्बर, नकुल कपुर, हरमन बावेजा वैगेरे नरपुंगव प्रति-हृतिक बनण्यासाठी बॉलिवुडात आले होते. पण दरम्यान हृतिकच्या मागेच पनवती लागल्यावर ह्यांना कोण विचारणार ?! "Darling" नावाचा एक भुतपट ज्यामध्ये फरदिन खान - ईशा देओल जोडी होती हा सिनेमा मल्टिप्लेक्स मध्ये पाहण्याईतक मनाचं मोठेपण माझ्यात होत. दुसऱ्या एका "हिरोज" नावाच्या सिनेमात सोहेल खान - वत्सल सेठ हे नायक होते. चांगल्या कथेची माती