Sad party songs

पार्टी रंगात आलेली असते. नायक, नायिका, सहाय्यक अभिनेता, खलनायक...! सगळेच पार्टीमध्ये 'भरी मैफिलमे मौजुद' असतात. पण नायक-नायिकेच्या नात्यात काहीतरी बिनसलेलं असत. एकमेकांपासून नजरा चुकवत म्हणा किंवा मिळवत म्हणा, आपला पडिक चेहरा घेऊन त्या उत्साही वातावरणावर विरजण टाकायचे काम ते इमानेइतबारे करत असतात. अचानक नायकाच्या हितचिंतकाला काय अवदसा आठवते माहीत नाही पण तो माईक नायकाच्या हातात देऊन त्याला गाण्याचा म्हणजे मैफिलको चार चांद लगाण्याचा आग्रह करतो, अन मग हिरोपण आपल्या दिलाच्या दर्दाला सुरोमे बांधकर पेश करतो. दरम्यान नायिकेचा बाप त्याच्या कोण्या मित्राच्या दोस्तीला रिश्तेदारीमध्ये तबदिल करायची अनाउंसमेंट करून बसलेला असतो. पडद्यावर राहुल रॉय, आमिर खान पासून अजय देवगणपर्यत अनेकांनी अशी गाणी 90s मध्ये साकारली आहे. दीपक तिजोरी, टिकू तलसानिया, सदाशिव अमरापूरकर अशा अनेकांनी नायकाला ऐन ढासळत्या क्षणी गात केलं होतं. छुपानाभी नही आता (बाजिगर) ए काश कही ऐसा होता (मोहरा) मै दुनिया भुला दुगा (आशिकी) इस तरह आशिकीका असर छोड जाऊंगा (इम्तिहान) *तु प्यार है किसीं और का (दिल हे के मानता नही) जिता था जीसके लिए (दिलवाले) अशी किती गाणी आठवावी?? थोडं अजुन मागे गेलं तर 'और इस दिलमे क्या रखा है (इमानदार) कभी सोचता हू (मजबूर) किंवा दिल के झरोके मे (ब्रह्मचारी)' अशी कित्येक गाणी आठवतील. नायक आणि त्याचा पियानो हा बॉलिवूडचा एक रम्य भाग आहे. सैगल पासुन अरिजित पर्यंत अनेकांचे दर्दभरे नगमे खेड्यापाड्यात ट्रक, टॅक्सी, रिक्षा, काळी-पिवळीमध्ये वाजत असतात. पण त्यातल्या त्यात 90s ची बात और आहे. सोनू निगम, उदित नारायण ह्यांना मानणारा वर्ग कितीही मोठा असला तरी कुमार सानुची दर्दभरी गाणी ऐकणारा एक वेगळा श्रोतावर्ग देशात आहे. आज की शाम, उन नगमोके नाम !! #CinemaGully

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

धन्यवाद साहेब

अदालत की कारवाई