Posts

Showing posts from March, 2018

प्रिय राहुलबाबा!

प्रिय राहुलबाबा! स.न.वि.वि. पत्रास कारण की नुकताच गुजरात निवडणुकांचे निर्णय पाहिले. आणि हे पत्र लिहावंसं वाटलं. खरतर एक सर्वसाधारण भारतीय म्हणून मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. कमी वयात आपल्या आजीचा गोळीबारात चाळण झालेला देह पाहणे किंवा वडिलांच्या मृतदेहाच्या तुकड्यावर अंतिम संस्कार करणे ह्यातील भीषणता फार कमी जणांना समझते. सुरक्षेच्या कारणास्तव देशविदेशात स्वतःची ओळख लपवत जगणे पण अवघड असते. त्यामुळे येणारे एकाकीपण, दुर्गुण, सर्वसामान्यांशी तुटलेली नाळ सर्व कळू शकते. पण गुजरात निवडणुकीतील राहुल गांधी वेगळा होता. जगज्जेत्या सिकंदरासमोर पोरस उभा रहावा तसा आवेश दिसत होता. आपल्या पहिल्याच मुलाखतीत अर्णव गोस्वामीच्या साध्या प्रश्नांना उत्तरे देऊ न शकणारा राहुल ते मोदींच्या चतुरंग सेनेला भिडू पाहणरा राहुल हा बदल स्वागतार्ह आहे. मनिशंकर अय्यरची हकालपट्टी, सोमनाथ मंदिरप्रवेश, काँग्रेसचा वाढलेला सोशल मिडिया सेन्स हे बदलाचे चांगले लक्षण आहे. विरोधक सक्षम असणे लोकशाहीत गरजेचे आहे त्यासाठी हार्दिक (पटेल) शुभेच्छा

सिंहासन

'सिंहासन' सिनेमाच्या क्लायमॅक्सला दाखवण्यात आलेली ही भिंत मला 'फेसबुक वॉल' सारखी वाटते. नोटाबंदी, जीएसटी,आदर्श, 2G, लोकपाल, लव्ह जिहाद, घरवापसी,राष्ट्रकुल, NDA, UPA, अवॉर्ड वापसी अशा हजारो बातम्यांच्या प्रवाहात आपली अवस्था निळूभाऊंनी साकारलेल्या पत्रकारासारखी होते. त्यांनी शेवटच्या सीनमध्ये जे हावभाव दाखवले आहेत त्यात फेसबुकच्या सर्व इमोजी दिसतात !! बहुमतासाठी केले जाणारे सर्व तोडफोडीच्या राजकारणाचे उपद्व्याप पाहून सर्वसामान्य माणसाच्या ओठावर फक्त "उष:काल होता होता काळरात्र झाली..!!!!' हेच शब्द येतात.

THE WALL

१९९६ चे ते दिवस खूप मस्त होते. सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा सारखे फलंदाज धावांचा पाऊस पाडत होते, वसिम-वकार सारखे गोलंदाज आग ओकत होते. अशातच भारतीय क्रिकेटक्षितिजावर सौरभ गांगुलीचा उदय झाला. इंग्लडविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून त्याने सर्वांची वाहवा मिळवली पण दुसऱ्या बाजूला थोडक्यात शतक हुकलेला एक नवोदित खेळाडू मात्र उपेक्षित राहिला, हि उपेक्षा पुढे आयुष्यभर त्याच्या पाठीशी राहिली. हा खेळाडू होता अर्थात 'राहुल द्रविड' ! व्ही.व्ही.एस.लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाचा अश्वमेध रोखला त्यावेळेस सुद्धा दुसऱ्या बाजूला द्रविडच उभा होता. पण कौतुक झालं लक्ष्मण आणि हरभजनच ! सेहवागच्या त्रिशतकात झाकोळण असो अथवा संघाच्या हितासाठी खालच्या क्रमांकावर खेळणे. द्रविडने सर्व काही सोसलं . कप्तान ,गोलंदाज ,फलंदाज, विकेट किपर जे सांगाल ते निमूटपणे करत गेला. सचिनला जो निरोप मिळाला तसा त्याला पण मिळणे अपेक्षित होते. पण तिथेही उपेक्षा नशिबी आली. आज तो त्याच निस्पृहतेने नवीन खेळाडू घडवित आहे. हॅपी बर्थडे राहुल ! तुला पाहून 'दि डार्क क्नाईट'चा क्लायमॅक्स आठवतो. He's the hero Gotham deserves,

आकांक्षेपुढती जिथे गगन ठेंगणे

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान इंग्लण्डचा प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल एकदा तुसडेपणाने म्हणाला होता की,"या अर्धनग्न-अशिक्षित भुकेल्या लोकांना स्वातंत्र्य दिले,तर आपापसात संघर्ष करून अराजक निर्माण करतील." पुढे साठच्या दशकात जनावरांना खायला घालतात तसा लाल गहू दुष्काळाने ग्रासलेल्या भारतीयांना अमेरिकेने निर्यात केला. एका उदयोन्मुख राष्ट्राची जेवढी चेष्टा करता येईल तेवढी ह्या महासत्तांनी केली. अशातच काही तरुणांनी स्वप्ने पाहिली ती अवकाशाला गवसणी घालण्याची !!! विक्रम साराभाई, सतीश धवन, मेघनाद सहा, अब्दुल कलाम... किती नावे घ्यावी?? परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळण्याची संधी सोडून ते भारतातच राहिले. थुम्बा नावाच्या दक्षिणेतल्या छोट्या गावात त्यांनी एक मोठे स्वप्न पाहिलं. अवकाश संशोधन क्षेत्रात आपल्या देशाचंही नाव व्हावं हे त्या सामान्य माणसांचं असामान्य स्वप्न होत. गावातल्या एका चर्चच्या प्रांगणात रॉकेट लॉन्च करण्याची तयारी सुरू झाली. चर्चच्या बिशपच घर कार्यशाळा बनली. एका उदयोन्मुख राष्ट्राला हा महागडा खटाटोप परवडणार नव्हताच !! सायकलच कॅरियर - बैलगाडी अशा मिळेल त्या मार्गान

धन्यवाद साहेब

काही दिवसांपूर्वी 'झी युवा' वाहिनीवर एका तरुणास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. दुर्दैवाने त्याच नाव ऐकलं नाही पण त्याने जे मुद्दे मांडले ते विचार करण्याजोगे होते. भारतात अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थाना स्वतःच्या काही कायदेशीर मर्यादा आहेत. आर्थिक किंवा इतर कारणास्तव १८ वर्षे पूर्ण झाली की अनाथ मुलांना अनाथाश्रम सोडावा लागतो. हे वय आयुष्याला कलाटणी देणारे असते कारण उच्चशिक्षण घ्यायचं तर फी परवडणारी नसते, अचानक एका रात्रीतून डोक्यावरचे छत गेल्याने राहण्याची सोय नसते, नोकरी मिळेलच ह्याची शाश्वती नाही, शिष्यवृत्ती किंवा सरकारी नोकरीची आस धरावी तर जातीच प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पालकांच उत्पन्न दाखविता येत नाही. त्या पुरस्कार विजेत्या तरुणाने अशा अनेक अडचणी सांगितल्या. तो स्वतः एक अनाथ मुलगा असल्याने त्या अडचणीतून गेला होता. सुदैवाने त्याला शिक्षण व नोकरी दोन्ही मिळाल्याने तो रूढार्थाने 'वेलसेटल्ड' झाला. एकेदिवशी तो काही कारणास्तव त्याला संभाळणाऱ्या अनाथाश्रमात गेला असता त्याने जे पाहिलं त दृश्य हेलावून टाकणार होत. ज्या अनाथ मुलींनी त्याला भाऊ मानून राखी बांध

C.I.D

२० वर्षं म्हणजे हा फार मोठा कालखंड आहे. एखादी टीव्ही मालिका इतकी वर्षे चालणे, म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे. एक पूर्ण पिढी CID बघत वाढली आहे. आज Acp प्रद्युमन, दया, अभिजित, फ्रेडी, तारिका, डॉ.साळुंखे ही नाव लोकांच्या तोंडपाठ झाली आहे. 'सिंघम रिटर्न' सिनेमात दया दरवाजा तोडतानाचा एक सीन आहे, हा एकटा सीन पूर्ण सिनेमात भाव खाऊन जातो. सगळं थिएटर "दया ! तोडदो दरवाजा' म्हणतो तेव्हा CID च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. गुन्हेगारीविषयक मालिका असून सुद्धा त्यांनी खूप संयमित हाताळणी करत स्वतःचा दर्जा सांभाळून ठेवला आहे. 'सावधान इंडिया' किंवा 'क्राईम पेट्रोल' सारखा सवंगपणा त्यांनी प्रकर्षाने टाळला. गुन्हेगारांचे आडनाव दाखविणे टाकून कोण्या एका समूहाला गुन्हेगार दाखविणे बऱ्याचदा टाळले. 'युपी फाईट बॅक' किंवा 'मुंबई फाईट बॅक' म्हणत कोणत्याही शहराभोवती गुन्हेगारीच वलय निर्माण केलं नाही. लहान मुलांसह पूर्ण कुटूंब आपला शो बघत ही त्यांची भावना अनेकदा जाणवते म्हणून अपेक्षित मसाला नसल्याने CID आता कंटाळवाणी वाटू लागली आहे. तरीदेखील ह्या उथळ मालिकांच्या जगात CID

MPSC

६९ जागांसाठी २००००० अर्ज ! ही आकडेवारी खुप भयावह वाटणारी आहे. आज वृत्तपत्रात स्पर्धा परीक्षांचे भयानक वास्तव वाचले. शासकीय पदांच्या जाहिराती लवकर सुटत नाही, मग सुटल्याच तर दीर्घकाळ चालणारी भरती प्रक्रिया, परत कोणीतरी स्टे आणला की होणारी फरपट, न परवडणारी परीक्षा फी, काळासोबत बदलणारे पॅटर्न, उमेदीचा वाया जाणारा काळ, वाढणाऱ्या शिक्षणसंस्थांची स्पर्धा, स्टडी सर्कलच्या पुस्तकांची पारायणे, तरीपण धीर सुटत नाही कारण व्हाट्सअप-फेसबूकवर पाहिलेले नागरे पाटील- बानूगडे पाटील ह्यांची प्रेरक दिवास्वप्ने दाखवणारी भाषणे....!! हे भयाण चित्र आहे.

HISTORY

4 thought provoking statements related to History. 1) If you wants to kill someone kill his history first. 2) Study the historian before you study the history. 3) History remembers to only those who either creates problems or resolves it. 4) Ultimately winners writes history.

राष्ट्रीय विज्ञान दिन

आमच्या शाळेच्या वाचनालयात निरंजन घाटे, मोहन आपटे, जयंत नारळीकर अशा अनेक विज्ञानलेखकांची पुस्तके होती. त्या वयात विज्ञानाची गोडी लावण्याचे काम त्यांनी केले. मध्यंतरी मित्राला म्हणालो की त्यांचे एक व्याख्यान आयोजित करूया, तर तो म्हणाला की त्यांचे आता बरेच वय झाले असून त्यातले काहीजण सार्वजनिक क्षेत्रात फारसे दिसत नाही. अशी माणसे थकलेली पाहवत नाही. नेहमी प्रकाशझोतात राहतील असं ग्लॅमर त्यांना नसत, पण मध्येच कधितरी राष्ट्रीय विज्ञान दिन सारखा आजचा दिवस उजाडतो अन त्यांची आठवण येते.

शिवजंयती

"चौऱ्यांशी बंदरामाजी ऐसी जागा नाही" असे म्हणत छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग उभारण्याचा संकल्प सोडला होता. सिद्दी-पोर्तुगीजांना शह मिळावा म्हणून सागरी सीमा बळकट करण्याचा निर्णय घेतला आणि कुरटे बेटावर सिंधुदुर्गाची जागा निश्चित केली. पण ह्या दुर्गाच्या भूमिपूजनासाठी स्थानिक पुरोहित तयार होईना. परकीय सत्ताधीश उरावर असताना शिवरायांची पाठ वळताच आपले काय होईल हि भीती होती. पण शिवरायांनी त्यांच्या मनातील हि भीती ओळखली त्यांना धीर देऊन आश्वस्त केले कि त्यांच्या जीविताला कोणाचं धोका राहणार नाही. मालवणचे जानभट व दादंभटअभ्यंकर हे दोन मामा-भाचे अखेरीस तयार झाले. पुढे खरॊखरच मालवणावर परचक्र चालून आले. तेव्हा स्वराज्याच्या शिलेदारांनी त्यांना सुखरूप स्थळी पोहोचवण्याची तयार दाखवली पण या दोघांनीही अशा संकटसमयी स्वराज्यापासून दूर जाण्यास नकार दिला. शिवरायांनी जलदुर्गहि बांधले आणि मनोदुर्गही !!! "मैदानसे भागनेवाले 'भाग' लेकर लढने लगे" हेच शिवरायांनी घडवलेल्या स्वराज्याच्या यशाचे गमक आहे. म्हणून मनोमन आठवावा जाणता राजा #शिवजंयती

Data आणि knowledge

लहानपणी एक गोष्ट वाचली होती, प्रख्यात चिनी प्रवासी हयू एन त्संग हा भारतात बरीच वर्षे राहून मायदेशी परत निघाला होता. परतीच्या प्रवासात अचानक खूप पाऊस सुरू झाला. ह्यु एन संग ज्या मोठ्या नावेत बसला होता ती हेलकावे खाऊ लागली होती. ह्यु एन संग व त्याच्या साथीदारांना जलसमाधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती, यावर उपाय फक्त एकच होता व तो म्हणजे नावेतील अवजड साहित्य फेकून देणे. ह्या साहित्यात कित्येक वर्ष प्रवास करून जमवलेली ग्रंथसंपदा होती. आयुष्यभर मेहनत करून कमावलेले ज्ञान होत. ते फेकायच धाडस होत नव्हतं. अखेर हयू एन त्संगच्या शिष्यांनी/साथीदारांनी ह्या ग्रंथांच्या रक्षणासाठी स्वतःला त्या प्रवाहात झोकून दिले. यामागचा दंतकथेचा भाग जरी सोडला तरी ज्ञानाची महती कळून येते. आज फेसबुकवर दिखाऊ पंडितांचा सुळसुळाट झाला आहे. नेटपॅक फ्री झाल्यामुळे डेटा स्वस्त झाला आहे. पण data आणि knowledge ह्यात फरक आहे. गुगलवर सर्च मारून माहिती काढायला काहीच वेळ लागत नाही. आज इतकी परकीय आक्रमण होऊनही आपला इतिहास वाचायला भेटतो कारण कारण हयू एन त्संग सारख्यांनी आपली हयात घालवून तेवढा अभ्यास केला . कॉपी पेस्ट करून म

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजे भारतीय अभियंत्यांचे आदरस्थान ! एकदा रेल्वेतुन प्रवास करीत असताना ते पुस्तकाचे वाचन करीत होते. सर्व सुरळीत चालू असताना अचानक त्यांनी हातातील पुस्तक खाली ठेवले व रेल्वे डब्यातली चेन पटकन खाली ओढली. त्यामुळे ती भरधाव रेल्वे थांबवावी लागली. ‘हा उद्योग कोणी केला?’ हे बघायला रेल्वेचे कर्मचारी त्या डब्यात आले तेव्हा विश्वेश्वरय्या शांतपणे त्यांना म्हणाले की, “रुळांच्या व्हायब्रेशनचा आवाज बदलला आहे, हा ट्रॅक पुढे तुटला असण्याची शक्यता आहे.” विश्वेश्वरय्यांचा अंदाज खरा होता. त्यांनी प्रसंगावधान राखल्याने कित्येक प्रवाशांचे प्राण वाचले. अशा थोर व्यक्तीचे नाव भाषणातून नीट उच्चारता नाही आले तरी चालेल पण त्यांच्या कर्तृत्वातून काहीतरी बोध घ्यावा.

गाथा ३ सफरचंदांची

असं गंमतीने म्हणतात की या जगात 3 सफरचंदांनी इतिहास रचला ! पहिलं सफरचंद, बायबलमधल्या ऍडम आणि ईव्हच्या कथेतील आहे. ‘एडम आणि ईव्ह’ हे सृष्टीकर्त्याने निर्माण केलेले पहिले ‘स्त्री व पुरुष’! त्या कथेनुसार सर्परूपी सैतान हा एडम आणि ईव्हला स्वर्गलोकीच्या वृक्षावरील सफरचंद खाण्याची प्रेरणा देतो. ते  सफरचंद खाल्यावर ईव्हला लज्जेची ज्ञानप्राप्ती होते. आपल्या विवस्त्रपणाची जाणीव होताच ती एडमच लक्ष जाऊ नये म्हणून झाडामागे लपते. दुसरे सफरचंद, आयझेक न्यूटनने पाहिलेले. ते सफरचंद पडताना पाहून न्यूटनला गुरूत्वाकर्षणाच्या सिद्धांताची कल्पना सुचली असे मानले जाते. आणि तिसरे सफरचंद म्हणजे स्टिव्ह जॉब्सच्या ऍपल कंपनीच्या लोगोमधले ! ह्या कथांमागचा गंमतीचा किंवा दंतकथेचा भाग सोडला तर अप्रत्यक्षरित्या हे विज्ञानाच्या इतिहासाचे ३ टप्पे दाखवतात. हे टप्पे विज्ञानक्षेत्रातले असल्याने त्याला इतिहासाप्रमाणे काळांचे वर्गीकरण लावणे चुकीचे ठरेल. एडम आणि ईव्हच्या कथेला धार्मिक पार्श्वभूमी आहे. (इस्लाममध्ये हीच कथा आदम आणि हौव्वा ह्यांच्या नावाने सांगितली जाते. मनुष्यप्राण्याला ‘आदमजात’ त्यावरूनच म्हटले जाते.) ही

इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (बायोपिक्स आणि सत्यघटना)

Image
भाग 5 बायोपिक्स आणि सत्यघटना 'Cinema is the most beautiful fraud in the world' प्रख्यात आंतरराष्ट्रीय सिनेदिग्दर्शक गोदार्द ह्यांचं हे वाक्य खूप काही सांगून जाते. सिनेमा हि एक सुंदर फसवणूक आहे. अडीच तीन तास आपल्याला एका आभासी विश्वात घेऊन जातो आणि आपण स्वतःच अस्तित्व विसरून त्या त्या पात्राशी एकरूप होऊन हसतो, रडतो, किंवा गाऊ लागतो. पण इतिहास म्हणजे फसवणूक नाही त्या शब्दाचा अर्थच ‘हे असं आहे’ असा रोखठोक ! त्यामुळे बायोपिक्स किंवा सत्यघटना पडद्यावर आणताना मसाला किती टाकावा हि एक अडचण बनते. उदा. दादासाहेब फाळके हे जादूचे प्रयोग करायचे व त्या अनुषंगाने येणारी विनोदबुद्धी त्यांच्यात असावी असा तर्क आपण करू शकतो. पण त्यांना जवळून पाहणारे अनेक जण सांगतात की दादासाहेब कडक शिस्तीचे व तापट स्वभावाचे होते. तसेच उतारवयात आलेल्या आर्थिक चणचणीतून थोडे खचले होते असे उपलब्ध पत्रातून जाणवते परंतु ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ ह्या सिनेमातून विनोदाच्या अंगाने त्यांचे चित्रण केल्याने त्यांच्या चरित्राची ती गंभीर बाजू जाणवत नाही. ह्या उलट गोष्ट ‘भाग मिल्खा भाग’ची ! मिल्खासिंग ह्यांचे ऑलिम्पिक पदक हुकल

इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (रामायण-महाभारत)

Image
भाग 4 रामायण आणि महाभारत हि दोन आर्ष महाकाव्ये निःसंशयपणे भारतीय संस्कृतीचे दोन आधारस्तंभ आहेत. भारतीय व्यक्ती, शहरे, नद्या, वास्तूंच्या नावातूनदेखील त्यांचे अस्तित्व आजही जिवंत आहे. त्यातील पात्रे व त्यांच्या आचरणाचा भारतीय समाजमनावरील परिणाम हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. ह्या दोन्ही महाकाव्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय 80 च्या दशकात प्रसारित झालेल्या दोन दूरदर्शन मालिकांच्या निमित्ताने आला होता. रामानंद सागर ह्यांची 'रामायण' आणि बी.आर.चोप्रा ह्यांचे 'महाभारत' ह्या मालिकांनी बनविलेले TRP चे विक्रम अपूर्व होते. त्या मालिकांच्या प्रसारणादरम्यान रस्त्यांवर अघोषित संचारबंदी जाणवायची, लहान मुले युद्धाचे अनुकरण करीत असताना जखमी झाल्याच्या बातम्या यायच्या, अंत्यविधी सुद्धा थांबविले जात असे, टीव्ही समोर अगरबत्ती लावून मालिका पाहिली जाई. त्या काळात वाहिन्यांचा इतका महापूर नव्हता. डेली सोपं हि कल्पना त्याकाळी नव्हती किबहुना दूरदर्शनच्या सरकारी नियमात एपिसोड्सचे बंधन असल्याने अनेक उपकथा गाळाव्या लागल्या होत्या. इथूनच सिनेमॅटिक लिबर्टीचा वाद सुरू होतो. कारण पुढे अनेकांनी डेली

इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (मुघल सल्तनत)

Image
भाग 3 मुघल सल्तनत केवळ चित्रपट पाहून भारतीय इतिहासाचा नित्कर्ष काढायचा ठरला तर मुघल सल्तनत म्हणजे प्रेमवीर बादशाहांची परंपरा असलेला फॅमिली बिझनेस वाटेल. अनारकली, मुघल-ए-आझम, ताजमहल, जोधा-अकबर अशा विविध चित्रपटातून मुघल बादशाह मोठ्या पडद्यावर आपल्या समोर आले आहेत. तर बहादूरशाह जफर, भारत-एक-खोज, अकबर-दि-ग्रेट, द ग्रेट मराठा आदी मालिकातून छोट्या पडद्यावर पण त्यांच्या कथा दाखविण्यात आल्या आहेत. ह्यात सर्वात जास्त उल्लेखनीय नाव म्हणजे अभिनेत्यांचे पितामह पृथ्वीराज कपूर ह्यांनी साकारलेला 'जलालुद्दीन मुहम्मद अकबर !!' मुघल-ए-आझम सिनेमातला बुलंद आवाजाचा आणि धिप्पाड शरीरयष्टीचा अकबर त्यांनी असा काही रंगविला कि पुढची बरीच वर्षे अकबर साकारणाऱ्या इतर अभिनेत्यांनी सुद्धा त्यांचे अनुकरण करीत नाहक खर्जातला आवाज काढुन भूमिकेत दमदारपणा आणण्याचा प्रयत्न केला. किल्ल्याच्या तटावरून दमदार पाऊले टाकत चालणारा सिनेमातला हा अकबर पाहून खऱ्या अकबराला सुद्धा हेवा वाटला असता. येथूनच सिनेमॅटिक लिबर्टीचा वाद सुरू होतो, कि अकबराची देहबोली नेमकी कशी होती??? अकबर असाच दिसत असायचा का? सलीम-अनारकलीच्या प्रेमा

इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (संतपट)

Image
भाग 2 .. संतपट पौराणिक सिनेमाचं युग संपून संतपटांचा ट्रेंड आला, तेव्हा खऱ्या अर्थाने 'कला आणि इतिहासाचा' संघर्ष सुरू झाला. कारण पौराणिक मालिकांमध्ये चमत्कार दाखविण्याचे स्वातंत्र्य होते, परंतु संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत तुकाराम, अशा अनेक संतांच्या जीवनपटात काल्पनिक प्रसंगांचा समावेश करण्यात आल्याने ते वास्तवापासून दुर गेले. उदा. प्रभातचा सार्वकालिक महान सिनेमा 'संत तुकाराम' ! भारताबाहेर (overseas) ख्याती मिळविलेला हा पहिला सिनेमा ! व्हेनिस चित्रपट महोत्सवात पाश्चात्य समीक्षकांनी तर येशू ख्रिस्ताच चरित्र पाहिल्याचा भास झाला अशी प्रशंसा केली. ह्या सिनेमाने अफाट लोकप्रियता मिळवली. तुकारामांची भूमिका करणाऱ्या विष्णुपंत पागनिसांना अशी लोकप्रियता मिळाली की गावोगावी आजही त्यांचे छायाचित्र तुकाराम महाराज म्हणून पुजले जाते. प्रेक्षक चक्क चित्रपटगृहाबाहेर चप्पल काढून आत जात असत. लोक पागनिसांच्या पाय पडत असत. पागनिसांनी सुद्धा हि लोकांच्या मनातील प्रतिमा जपन्यास्तव पुढे अधिक सिनेमात काम केले नाही. ह्या सिनेमात विठोबाच्या कृपेने आकाशातून धान्यवृष्टी होते, मुघल सेनेला

इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (पौराणिक सिनेमा)

Image
भाग 1 .. पौराणिक सिनेमा भारतीय जनमानसाला 'सिनेमा' आणि 'क्रिकेट'ह्या दोन गोष्टींचे प्रचंड वेड आहे. त्यातच सिनेमातल्या फॅशन, संवाद, प्रसंग ह्यांचा दैनंदिन जीवनावर खूप परिणाम दिसून येतो, त्यामुळे इतिहासाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या समाजात सिनेमॅटिक लिबर्टी हि चित्रपट निर्मात्यासाठी एक कसरतच असते. संजय लीला भन्साळी ह्यांच्या बहुचर्चित 'पद्मावती' सिनेमाच्या निमित्ताने हे नुकतंच दिसून आले. त्यानिमित्ताने 'ऐतिहासिक चित्रपट' आणि 'वास्तव' ह्यांचा वेध घेण्याचा एक प्रयत्न ह्या छोटेखानी लेखमालिकेतून करत आहे. आवडेल अशी आशा बाळगतो. 3 मे 1913 रोजी 'राजा हरिश्चंद्र'च्या रूपाने भारतीय सिनेमाची सुरुवात झाली. त्याकाळी भारतात हा व्यवसाय नवाच होता त्यामुळे या चित्रपटातील कलावंत कुठे काम करायचे ह्यांचं उत्तर देताना 'हरीश्चंद्राच्या फॅक्टरी'त असे उत्तर द्यायचे.(तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास आज 'रामगोपाल वर्माकी फॅक्टरी'पर्यत आला आहे.😀). दादासाहेब फाळके ह्यांनी येशु ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित एक सिनेमा पाहिला होता, तो सिनेमा पाहिल्यानं

रंग दे बसंती

Image
राजकुमार संतोषी दिग्दर्शीत ‘दि लिजेंड ऑफ भगतसिंग’ ह्या चित्रपटाच्या सुरुवातीस एक प्रसंग आहे. महात्मा गांधी रेल्वेतून उतरत असतात आणि खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांना जाब विचारतो, कि ‘तुम्हाला शक्य असताना देखील तुम्ही भगतसिंग व त्याच्या सहकारयांची फाशी का थांबवू शकले नाही?” ह्यावर बापू खाली मान घालून निघून जातात, आणि चित्रपटगृहात बसलेल्या सर्व प्रेक्षकांप्रमाणे आपणही त्यांना तिरस्कारपूर्वक नजरेने हेटाळतो. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा इतर कोणत्याही क्रांतिकारकापेक्षा भगतसिंगच्या नावाचे गारुड ह्या पिढीवर फार आहे, इतके कि काही वर्षापूर्वी एकाच वेळी 5 जणांनी भगतसिंगच्या आयुष्यावर चित्रपटाची घोषणा केली। पुढे ‘रंग दे बसंती’ मध्ये भगतसिंग व त्याच्या साथीदारांचा जीवनपट दाखविण्यात आला होता! लहानपणी शेतात बंदुकाची रोपे लावणारा, जालियनवाला बागेच्या हत्याकांडाने हेलावणारा, सँडर्सवर गोळीबार करणारा, असेम्बलीत बॉम्ब फेकणारा, कारागृहात 55 दिवस उपोषणास बसणारा, आणि अखेर ‘जिस चोलेको पहन शिवाजी खेले अपनी जानसे’ असे गीत गात फासावर जाणारा भगतसिंग आपल्याला माहित आहे। पण हाच स्वाभिमानी

तुघलक

Image
तुघलक….वेडा कि शहाणा ! मराठी भाषेत पूर्वापार एक वाक्प्रचार वापरला जातो तो म्हणजे “तुघलकी फर्माण”!! तसेच एखाद्या विचित्र किंवा जगावेगळे काम करणाऱ्यास “वेडा महमंद” म्हटलं जाई. ह्या दोन्ही वाकप्रचारांचा मागोवा घेतला तर हि कथा पोहोचते दिल्लीच्या सुलतान महंमद बिन तुघलकापर्यंत. हे महाशय जेवढे कठोर तितकेच कल्पक होते. एकदा त्याच्या मनात आले कि देशाची राजधानी दिल्लीवरून औरंगाबादला (तेव्हाची देवगिरी/दौलताबाद) हलवायची. त्याने फर्माण काढून दिल्लीच्या प्रजेला तिकडे जाण्यास सांगितलं। मोठी हालअपेष्टा सहन करीत दिल्लीवासी औरंगाबादला दाखल झाले परंतु हा निर्णय अंगलट येतोय हे लक्षात आल्यावर पुन्हा घूमजाव करावे लागले. ह्या गोंधळात प्रवासामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले। पुढे तुघलकच्या मनात चीन आणि इराणवर स्वारी करण्याची कल्पना आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती करून त्यांना पुरेसे वेतन दिले. पण दोन्ही उद्दिष्ट्ये पूर्ण होणे दूरच राहिले. अपुरी तयारी आणि ढिसाळ नियोजनामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले. नन्तर अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून सोन्या चांदीच्या नाण्यांवर बंदी आणून तांब्याची नाणी बनवली,पण पुन्हा

People you may know

Image
१९४७ साली गोऱ्या साहेबाने देश सोडला त्यानंतर गोऱ्या साहेबाशी बोलण्याची संधी कधी मिळाली नाही. मधल्या काळात त्या मनोजकुमार वैगैरे मंडळींनी ‘गोरा साहेब कसा वाईट आणि आपण कसे चांगले’ हे पटवून दिल्याने साहेबाबरोबरचे बिघडलेले संबंध तसेच राहिले. नाही म्हणायला गोऱ्या साहेबाने जाता जाता ‘क्रिकेट, चहा, थँक्यू, सॉरी,हॅपी बडडेच्या वाढदिवसाचे गाणे…’ असा बराच ऐवज मागे ठेवला होता. अधून मधून आठवण आली की साहेब क्रिकेटचं निमित्त काढून परत भेटायला यायचा ! पण त्या शिवाजी पार्कच्या लहानसहान पोरांनीपण साहेबाचे रेकॉर्ड मोडून काढल्याने साहेब अजून वर्ल्डकपसाठी झुरतोय. पुढे पुढे तर असं झालं की फ्लिंट्फने शर्ट काढला कि सौरवदादा पण शर्ट काढून खुन्नस द्यायचा ! एंड्यु कॅंडिकने आव्हान दिले की सचिन त्याला कानशिलात मारल्यासारखा सिक्सर मारायचा ह्या प्रकारामुळे साहेबाची भीती कोणाला राहिली नाही. साहेब पाहण्याचा योग फक्त ज्यूरासीक पार्क, जु्मांजी, गॉडझिला पाहण्याच्या निमित्ताने येई त्यातही अक्राळविक्राळ प्राण्यांचे कौतुक जास्त असल्याने इतर बाबीकडे कधी लक्ष गेले नाही. शेतकऱ्यांचा लगान माफ करण्यासाठी क्रिकेटची मॅच आयोजित

रामशेज

Image
पेठला बदली झाली तेव्हापासून 'नाशिक-पेठ' मार्गावरचा छोटासा रामशेज किल्ला नित्य परिचयाचा झाला. भरधाव धावणाऱ्या बसच्या खिडकीमधून रामशेज दिसला की मंदिर दिसल्याप्रमाणे हात जोडण्याची इच्छा होते. कदाचित नाशिकच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला कल्पना नसेल की शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या किंल्ल्याने इतिहासात काय चमत्कार घडवला होता. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला हायसे वाटले होते, की आता दक्खन आपल्या मुठीत घेण्याची हीच वेळ आहे. शिवराय हयात असेपर्यत ह्या मुलुखात येण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे शिवरायांच्या मृत्यूनंतर खचलेला महाराष्ट्र सहज चिरडून टाकू हा त्याचा कयास होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होत. अफाट फौजफाटा घेऊन अनुभवी आलमगीर दख्खनेत उतरला होता. मराठेशाही, कुतुबशाही, आदिलशाही तिन्ही शाह्या संपविण्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. दुसरीकडे उभा होता एक तरणाबांड छत्रपती !!! आपल्या पराक्रमी पित्याने मागे सोडलेला गौरवशाली वारसा टिकवून ठेवण्यासाठी वज्रनिर्धार केलेले शंभूराजे !! मूठभर माणसं, थोडेफार किल्ले, कोकणपट्टीेतले नवोदित आरमार या सर्वांच्या जी

तुम्हाला नाशिककर व्हायचं आहे का? भाग २

Image
तुम्हाला नाशिककर व्हायचंय का हा प्रश्न विचारत (पु.लं च्या कृपेने) पहिली पोस्ट लिहिली होती पण ती पोस्ट लिहून झाल्यावर "गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे , माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने" अशी गत झाली. गेली हजारो वर्षे इतिहासाचा मूक साक्षीदार असणाऱ्या ह्या 'अजब'' शहराची 'गजब' कथा एका पोस्टमध्ये मावणारी नव्हती म्हणून दुसरी लिहिण्याचे धाडस करतोय. पहिली पोस्ट वाचल्यावर अनेक जण म्हणाले कि 'नासिक' शब्दच योग्य आहे पण त्यापैकीच एखादी व्यक्ती गावात फेरफटका मारायला गेली कि ती जुन्या नाशकात चाललोय हेच म्हणते जुन्या नासकात म्हणत नाही, (अस्सल नाशिककरासाठी 'गाव" म्हणजे जुने नाशिक आणि 'रोड' म्हणजे नाशिकरोड हा समानार्थी शब्द असतो) असो, हा नावाचा वाद ना संपणारा आहे. नाशिककरांना परिवर्तनाची खूप आवड आहे. ते काळासोबत बदलतात. वाहते पाणी शुद्ध राहते म्हणून प्रवाहाच्या सोबत राहणे हा नाशिककरांचा स्थायीभाव आहे म्हणूनच एकेकाळी शहराचं पावित्र्य भंग पावेल म्हणून रेल्वेला गावापासून दूर ठेवणाऱ्या नाशिककरांना आता मेट्रोचे वेध लागले आहेत.

तुम्हाला नाशिककर व्हायचं आहे का? भाग १

Image
खरतर मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर ह्यंचाच उल्लेख करून पु.लं.नि तसा आमच्यावर अन्यायच केला. कारण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर ज्यांच्यापुढे कर जोडावे अशा जुन्या शहरात नाशिक थोडं सिनियर आहे. असो, तर तुम्हाला नाशिककर व्हायचं आहे का? व्हा ! नक्की व्हा ! पण त्यासाठी आधी नाशिकला नाशिकचं म्हणता आले पाहिजे, उगाच सदाशिव पेठी थाटात तर सानुनासिक 'नासिक' म्हणाल तर तुम्ही पहिल्या फेरीत बाद व्हाल. कारण तुम्हाला कामधंद्यानिमित्त लागलेली पुणेरी हवा लगेच ओळखू येईल. खरा नाशिककर हा नासिकला 'नाशिक' आणि गोदावरीला 'गंगा" म्हणतो हा अलिखित नियम आहे. नाशिककर व्हायचं असेल तर सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना "प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीत......." हे वाक्य सुरुवातीलाच उच्चारले नाही तर तो फाऊल गणला जातो. खऱ्या नाशिककराला श्रीरामाबद्दल जेव्हढी आस्था आहे तेवढी कुंभमेळ्याबद्दल नाही, कारण आपण मुळात श्रीरामाचे अनुयायी असल्याने पाप केलेच नाही तर धुवायचे कशाला? असा रोख सवाल ते विचारतात. घरच्या नळाला रामकुंडाचेच पाणी असते हा सार्थ विश्व