Data आणि knowledge
लहानपणी एक गोष्ट वाचली होती, प्रख्यात चिनी प्रवासी हयू एन त्संग हा भारतात बरीच वर्षे राहून मायदेशी परत निघाला होता. परतीच्या प्रवासात अचानक खूप पाऊस सुरू झाला. ह्यु एन संग ज्या मोठ्या नावेत बसला होता ती हेलकावे खाऊ लागली होती. ह्यु एन संग व त्याच्या साथीदारांना जलसमाधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती, यावर उपाय फक्त एकच होता व तो म्हणजे नावेतील अवजड साहित्य फेकून देणे. ह्या साहित्यात कित्येक वर्ष प्रवास करून जमवलेली ग्रंथसंपदा होती.
आयुष्यभर मेहनत करून कमावलेले ज्ञान होत. ते फेकायच धाडस होत नव्हतं. अखेर हयू एन त्संगच्या शिष्यांनी/साथीदारांनी ह्या ग्रंथांच्या रक्षणासाठी स्वतःला त्या प्रवाहात झोकून दिले.
यामागचा दंतकथेचा भाग जरी सोडला तरी ज्ञानाची महती कळून येते.
आज फेसबुकवर दिखाऊ पंडितांचा सुळसुळाट झाला आहे.
नेटपॅक फ्री झाल्यामुळे डेटा स्वस्त झाला आहे. पण data आणि knowledge ह्यात फरक आहे.
गुगलवर सर्च मारून माहिती काढायला काहीच वेळ लागत नाही.
आज इतकी परकीय आक्रमण होऊनही आपला इतिहास वाचायला भेटतो कारण कारण हयू एन त्संग सारख्यांनी आपली हयात घालवून तेवढा अभ्यास केला . कॉपी पेस्ट करून महापुरुषांच्या चूक दाखविणार्यांना काय कळणार???
Comments