राष्ट्रीय विज्ञान दिन
आमच्या शाळेच्या वाचनालयात निरंजन घाटे, मोहन आपटे, जयंत नारळीकर अशा अनेक विज्ञानलेखकांची पुस्तके होती. त्या वयात विज्ञानाची गोडी लावण्याचे काम त्यांनी केले.
मध्यंतरी मित्राला म्हणालो की त्यांचे एक व्याख्यान आयोजित करूया, तर तो म्हणाला की त्यांचे आता बरेच वय झाले असून त्यातले काहीजण सार्वजनिक क्षेत्रात फारसे दिसत नाही.
अशी माणसे थकलेली पाहवत नाही. नेहमी प्रकाशझोतात राहतील असं ग्लॅमर त्यांना नसत, पण मध्येच कधितरी राष्ट्रीय विज्ञान दिन सारखा आजचा दिवस उजाडतो अन त्यांची आठवण येते.
Comments