C.I.D
२० वर्षं म्हणजे हा फार मोठा कालखंड आहे. एखादी टीव्ही मालिका इतकी वर्षे चालणे, म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे. एक पूर्ण पिढी CID बघत वाढली आहे.
आज Acp प्रद्युमन, दया, अभिजित, फ्रेडी, तारिका, डॉ.साळुंखे ही नाव लोकांच्या तोंडपाठ झाली आहे.
'सिंघम रिटर्न' सिनेमात दया दरवाजा तोडतानाचा एक सीन आहे, हा एकटा सीन पूर्ण सिनेमात भाव खाऊन जातो.
सगळं थिएटर "दया ! तोडदो दरवाजा' म्हणतो तेव्हा CID च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
गुन्हेगारीविषयक मालिका असून सुद्धा त्यांनी खूप संयमित हाताळणी करत स्वतःचा दर्जा सांभाळून ठेवला आहे.
'सावधान इंडिया' किंवा 'क्राईम पेट्रोल' सारखा सवंगपणा त्यांनी प्रकर्षाने टाळला.
गुन्हेगारांचे आडनाव दाखविणे टाकून कोण्या एका समूहाला गुन्हेगार दाखविणे बऱ्याचदा टाळले.
'युपी फाईट बॅक' किंवा 'मुंबई फाईट बॅक' म्हणत कोणत्याही शहराभोवती गुन्हेगारीच वलय निर्माण केलं नाही.
लहान मुलांसह पूर्ण कुटूंब आपला शो बघत ही त्यांची भावना अनेकदा जाणवते म्हणून अपेक्षित मसाला नसल्याने CID आता कंटाळवाणी वाटू लागली आहे. तरीदेखील ह्या उथळ मालिकांच्या जगात CID चा प्रवास असाच सुरू राहो. ही शुभेच्छा
Comments