THE WALL
१९९६ चे ते दिवस खूप मस्त होते. सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा सारखे फलंदाज धावांचा पाऊस पाडत होते, वसिम-वकार सारखे गोलंदाज आग ओकत होते.
अशातच भारतीय क्रिकेटक्षितिजावर सौरभ गांगुलीचा उदय झाला. इंग्लडविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून त्याने सर्वांची वाहवा मिळवली पण दुसऱ्या बाजूला थोडक्यात शतक हुकलेला एक नवोदित खेळाडू मात्र उपेक्षित राहिला,
हि उपेक्षा पुढे आयुष्यभर त्याच्या पाठीशी राहिली. हा खेळाडू होता अर्थात 'राहुल द्रविड' !
व्ही.व्ही.एस.लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाचा अश्वमेध रोखला त्यावेळेस सुद्धा दुसऱ्या बाजूला द्रविडच उभा होता. पण कौतुक झालं लक्ष्मण आणि हरभजनच !
सेहवागच्या त्रिशतकात झाकोळण असो अथवा संघाच्या हितासाठी खालच्या क्रमांकावर खेळणे. द्रविडने सर्व काही सोसलं .
कप्तान ,गोलंदाज ,फलंदाज, विकेट किपर जे सांगाल ते निमूटपणे करत गेला. सचिनला जो निरोप मिळाला तसा त्याला पण मिळणे अपेक्षित होते. पण तिथेही उपेक्षा नशिबी आली. आज तो त्याच निस्पृहतेने नवीन खेळाडू घडवित आहे.
हॅपी बर्थडे राहुल ! तुला पाहून 'दि डार्क क्नाईट'चा क्लायमॅक्स आठवतो.
He's the hero Gotham deserves, but not the one it needs right now. So we'll hunt him. Because he can take it. Because he's not our hero. He's a silent guardian, a watchful protector. A dark knight.
Comments