प्रिय राहुलबाबा!

प्रिय राहुलबाबा! स.न.वि.वि. पत्रास कारण की नुकताच गुजरात निवडणुकांचे निर्णय पाहिले. आणि हे पत्र लिहावंसं वाटलं. खरतर एक सर्वसाधारण भारतीय म्हणून मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. कमी वयात आपल्या आजीचा गोळीबारात चाळण झालेला देह पाहणे किंवा वडिलांच्या मृतदेहाच्या तुकड्यावर अंतिम संस्कार करणे ह्यातील भीषणता फार कमी जणांना समझते. सुरक्षेच्या कारणास्तव देशविदेशात स्वतःची ओळख लपवत जगणे पण अवघड असते. त्यामुळे येणारे एकाकीपण, दुर्गुण, सर्वसामान्यांशी तुटलेली नाळ सर्व कळू शकते. पण गुजरात निवडणुकीतील राहुल गांधी वेगळा होता. जगज्जेत्या सिकंदरासमोर पोरस उभा रहावा तसा आवेश दिसत होता. आपल्या पहिल्याच मुलाखतीत अर्णव गोस्वामीच्या साध्या प्रश्नांना उत्तरे देऊ न शकणारा राहुल ते मोदींच्या चतुरंग सेनेला भिडू पाहणरा राहुल हा बदल स्वागतार्ह आहे. मनिशंकर अय्यरची हकालपट्टी, सोमनाथ मंदिरप्रवेश, काँग्रेसचा वाढलेला सोशल मिडिया सेन्स हे बदलाचे चांगले लक्षण आहे. विरोधक सक्षम असणे लोकशाहीत गरजेचे आहे त्यासाठी हार्दिक (पटेल) शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल