सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजे भारतीय अभियंत्यांचे आदरस्थान !
एकदा रेल्वेतुन प्रवास करीत असताना ते पुस्तकाचे वाचन करीत होते. सर्व सुरळीत चालू असताना अचानक त्यांनी हातातील पुस्तक खाली ठेवले व रेल्वे डब्यातली चेन पटकन खाली ओढली. त्यामुळे ती भरधाव रेल्वे थांबवावी लागली. ‘हा उद्योग कोणी केला?’ हे बघायला रेल्वेचे कर्मचारी त्या डब्यात आले तेव्हा विश्वेश्वरय्या शांतपणे त्यांना म्हणाले की, “रुळांच्या व्हायब्रेशनचा आवाज बदलला आहे, हा ट्रॅक पुढे तुटला असण्याची शक्यता आहे.”
विश्वेश्वरय्यांचा अंदाज खरा होता. त्यांनी प्रसंगावधान राखल्याने कित्येक प्रवाशांचे प्राण वाचले.
अशा थोर व्यक्तीचे नाव भाषणातून नीट उच्चारता नाही आले तरी चालेल पण त्यांच्या कर्तृत्वातून काहीतरी बोध घ्यावा.
Comments