आकांक्षेपुढती जिथे गगन ठेंगणे
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान इंग्लण्डचा प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल एकदा तुसडेपणाने म्हणाला होता की,"या अर्धनग्न-अशिक्षित भुकेल्या लोकांना स्वातंत्र्य दिले,तर आपापसात संघर्ष करून अराजक निर्माण करतील."
पुढे साठच्या दशकात जनावरांना खायला घालतात तसा लाल गहू दुष्काळाने ग्रासलेल्या भारतीयांना अमेरिकेने निर्यात केला.
एका उदयोन्मुख राष्ट्राची जेवढी चेष्टा करता येईल तेवढी ह्या महासत्तांनी केली.
अशातच काही तरुणांनी स्वप्ने पाहिली ती अवकाशाला गवसणी घालण्याची !!!
विक्रम साराभाई, सतीश धवन, मेघनाद सहा, अब्दुल कलाम... किती नावे घ्यावी??
परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळण्याची संधी सोडून ते भारतातच राहिले.
थुम्बा नावाच्या दक्षिणेतल्या छोट्या गावात त्यांनी एक मोठे स्वप्न पाहिलं. अवकाश संशोधन क्षेत्रात आपल्या देशाचंही नाव व्हावं हे त्या सामान्य माणसांचं असामान्य स्वप्न होत.
गावातल्या एका चर्चच्या प्रांगणात रॉकेट लॉन्च करण्याची तयारी सुरू झाली. चर्चच्या बिशपच घर कार्यशाळा बनली.
एका उदयोन्मुख राष्ट्राला हा महागडा खटाटोप परवडणार नव्हताच !!
सायकलच कॅरियर - बैलगाडी अशा मिळेल त्या मार्गाने स्पेअर पार्ट आणून रॉकेट उडविण्याची तयारी सुरू झाली.
सर्व जग हसून गंमत बघत होत !
'खायला काही नाही पण रिकामी मिजास" असा दृष्टिकोन तर खुद्द देशवासीयांचाच होता. पण ते डगमगले नाही.
अखेर ते पहिलवाहिल रॉकेट अवकाशात झेपावल !!!!! श्वास रोखून सर्व शास्त्रज्ञ पाहत राहिले आणि सुरुवात झाली एका महान प्रवासाची !!
आज १०० चा आकडा गाठला आहे. हॉलिवूड सिनेमांच्या सायफाय मुव्हीजपेक्षा कमी खर्चात अवकाशमोहीम घेणारा देश म्हणून जगातले भले भले देश उपग्रह सोडण्यासाठी रांगा लावून बसलेत. पण हे बघायला त्या पहिल्या फळीतले बरेच जण नाहीत.
सचिन तेंडुलकरच्या शतकानंतर रवी शास्त्री जसा 'Take a bow master' म्हणायचा तस म्हणावसं वाटतं
'Take a bow ISRO',✋✋
Comments