धन्यवाद साहेब
काही दिवसांपूर्वी 'झी युवा' वाहिनीवर एका तरुणास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. दुर्दैवाने त्याच नाव ऐकलं नाही पण त्याने जे मुद्दे मांडले ते विचार करण्याजोगे होते.
भारतात अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थाना स्वतःच्या काही कायदेशीर मर्यादा आहेत. आर्थिक किंवा इतर कारणास्तव १८ वर्षे पूर्ण झाली की अनाथ मुलांना अनाथाश्रम सोडावा लागतो. हे वय आयुष्याला कलाटणी देणारे असते
कारण उच्चशिक्षण घ्यायचं तर फी परवडणारी नसते,
अचानक एका रात्रीतून डोक्यावरचे छत गेल्याने राहण्याची सोय नसते,
नोकरी मिळेलच ह्याची शाश्वती नाही,
शिष्यवृत्ती किंवा सरकारी नोकरीची आस धरावी तर जातीच प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पालकांच उत्पन्न दाखविता येत नाही.
त्या पुरस्कार विजेत्या तरुणाने अशा अनेक अडचणी सांगितल्या. तो स्वतः एक अनाथ मुलगा असल्याने त्या अडचणीतून गेला होता. सुदैवाने त्याला शिक्षण व नोकरी दोन्ही मिळाल्याने तो रूढार्थाने 'वेलसेटल्ड' झाला. एकेदिवशी तो काही कारणास्तव त्याला संभाळणाऱ्या अनाथाश्रमात गेला असता त्याने जे पाहिलं त दृश्य हेलावून टाकणार होत.
ज्या अनाथ मुलींनी त्याला भाऊ मानून राखी बांधली होती त्या वाममार्गाला लागल्या होत्या.
ज्यांची लग्न झाली त्यांच्या सासरच्या लोकांनी मोलकरणीसारखी वागणूक दिल्याचे कळले, काहींच्या नवऱ्यांनी पहिली बायको असताना दुसरी बायको म्हणून अनाथ मुलींचा छळ चालवला होता.
त्या तरुणाच्या बरोबरीचे इतर हुशार अनाथ तरुण डॉक्टर, इंजिनियर बनण्याची क्षमता असताना बुटपॉलिश किंवा किरकोळ कामे करत होती.
तरुण मंडळी निदान कुठेतरी आडोश्याला आसरा म्हणून राहू शकत होती पण तरुणींची अवस्था बिकट होती.
त्या युवकाने शक्य तेवढी मदत करून अनेकांना सुस्थितीत आणले.
आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला हा निर्णय त्या दृष्टीने पहिले पाऊल आहे.
पहिल्यांदा आरक्षणाचे स्वागत करावेसे वाटत आहे.
Comments