सिंहासन
'सिंहासन' सिनेमाच्या क्लायमॅक्सला दाखवण्यात आलेली ही भिंत मला 'फेसबुक वॉल' सारखी वाटते.
नोटाबंदी, जीएसटी,आदर्श, 2G, लोकपाल, लव्ह जिहाद, घरवापसी,राष्ट्रकुल, NDA, UPA, अवॉर्ड वापसी अशा हजारो बातम्यांच्या प्रवाहात आपली अवस्था निळूभाऊंनी साकारलेल्या पत्रकारासारखी होते. त्यांनी शेवटच्या सीनमध्ये जे हावभाव दाखवले आहेत त्यात फेसबुकच्या सर्व इमोजी दिसतात !!
बहुमतासाठी केले जाणारे सर्व तोडफोडीच्या राजकारणाचे उपद्व्याप पाहून सर्वसामान्य माणसाच्या ओठावर फक्त "उष:काल होता होता काळरात्र झाली..!!!!' हेच शब्द येतात.
Comments