बीस साल बाद

नविन वर्ष सुरू झाल्यापासुन मला गत 20 वर्षाच अवलोकन करायचं वेड लागलंय. कारण एकविसाव्या शतकात पाय ठेवल्यानंतर आपण काय काय कमावलं किंवा गमावलं हे समझण्यासाठी फिल्मी स्टाइलप्रमाणे 'बीस साल बाद' नित्कर्ष काढणे योग्य ठरेल. गेल्या वीस वर्षांत मॉल,मल्टीप्लेक्स संस्कृती आणि मोबाईल युग झपाट्याने वाढल. रिएलटी शो मुळे गल्लोगल्ली एखादा सेलिब्रिटी सापडू लागला. मला आठवतंय की 'कहो ना प्यार है' हा शेवटचा सिनेमा होता ज्याच तिकीट ब्लॅकने खरेदी केल होत. त्यावेळी 'ऋतिक मॅनिया' लिहिलेल्या वह्या आवर्जुन खरेदी करायचो. कोणताही डान्स शो असो 'टिडिंग टिडिंग'च्या म्युजिकवर 'एक पल का जीना' म्हणणारा ऋतिक फॅन असायचाच. गेल्या वीस वर्षांत एवढी अफाट लोकप्रियता इतर कोणाच्या वाटेला आलेली पाहिली नाही. ऋतिक हा एका अर्थाने शेवटचा सुपरस्टार होता. पुढच्या अनेकांचे स्टारडम चित्रपटासह कमी जास्त होत गेले. एकेका थिएटरमध्ये 25-50 आठवडे मुक्काम करणारे सिनेमे आता आढळून येतात का? दिवसाला इतक्या स्क्रीनवर शो त्यात परत मोबाईल पायरसी मुळे तेही संपुष्टात आल आहे. जितेंद्र-जया प्रदा ह्यांचा रामायनावरचा एक सिनेमा हा माझ्या आठवणीतला शेवटचा पौराणिक सिनेमा त्यानंतर सर्व पौराणिक कथानके छोट्या पडद्यावर साकारली गेली. 'हनुमान' सारखे अनिमेशनपट सोडले तर तो ट्रेंडही कमी झाला. छोट्या पडद्यावर तर एकाच काळात जय गंगा मैय्या, जय गणेश, श्री गणेश, जय हनुमान, ओम नम शिवाय अशा तब्बल 18 मालिका चालू होत्या. नितीश भारद्वाजची कमी काळ चाललेली गीतारहस्य मालिका किंवा संजय खान/एकता कपुरचे महाभारत पण अल्पजीवी ठरले. कव्वाली, भक्तिगीते, गझल, ह्यांच्या प्रमाणात पण घट झाली आहे. अपवाद सोडला तर नाव घेण्यासारख्या कोणीही नाही. हिरोला त्रास देणारा व्हिलन पण काळाच्या ओघात बदलला. खरतर बाजीगर पासूनच ही सीमारेषा धूसर होत चालली होती. वास्तव, धुम, कांटे, मुसाफिर, पाहताना नायक आणि खलनायक ह्यांच्या व्याख्याच पुन्हा तयार कराव्या लागल्या. नायक मधील अमरीश पुरींनी साकारलेला बलराज चौहान सोडला तर खरा बॉलिवूडी खलनायक तरी कोण ? (अपवाद गझनी किंवा जयकांत शिकरे) हिरोला धाकात ठेवणारा अमरीश पुरीचा आवाज मी खुप मिस करतोय. बॉलिवूड खुप बदलल आहे. गाजरका हलवा, माँ बाबुजी का आशिर्वाद, बहनकी शादी, मोहल्लेका दादा वैगेरे प्रमाण कमी झालय. अधूनमधून आपल्या मुळांकडे वळण होतच त्याशिवाय पर्यायही नाही. सौरभ रत्नपारखी #CinemaGully

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल