World Piano day

एकदा कुठेतरी वाचल होत की, जे संगीत ऐकून पाय हालतात (दाद देतात) ते पाश्चिमात्य संगीत असत आणि जे संगीत ऐकून डोक हलते (दाद देतात) ते भारतीय संगीत असत. ह्यातला देशप्रेमाचा भाग सोडला, तर संगीताला कोणतीही सीमारेषा नसते. 'पियानो' हे त्याचं सुंदर उदाहरण आहे. १७ व्या, १८ व्या शतकात इटलीमध्ये कधीतरी बार्टलोमियो ख्रिस्तोफोरी नावाच्या कोण्या संगीतप्रेमीने तयार केलेले हे वाद्य आज त्याच्या देशाच्या सीमा ओलांडून जगभर पसरलं आहे. हिंदी सिनेमातली कित्येक अविट गाणी पियानोवर रचली गेली आहेत. पियानोवर गाणाऱ्या नायकाचा चेहरा आठवला की सर्वात प्रथम कपुर घराणे डोळ्यासमोर येत. 'दोस्त दोस्त ना रहा (राज कपुर), चले थे साथ मिलकर (शशी कपुर), दिलके झरोके मे तुझको बिठाकर (शम्मी कपुर), जीवन के दिन छोटे सही (ऋषी कपुर), ए दिल है मुश्किल (रणबीर कपुर)....!" काही कथानकात तर पियानो कथेचाच एक भाग वाटतो, 'मेरी जंग' मधला अनिल कपुर ज्या पियानोवर 'जिंदगी हर कदम एक नई जंग है' गातो तो पियानोच त्याच्या मुक्या आईची वाचा परत मिळवून देतो. अंधाधुंद मधला आयुषमान खुराणाचा तर सगळा रोलच पियानोवादकाचा.!! कधी 'मोहरा' सारख्या सिनेमात 'ए काश कही ऐसा होता,' म्हणनारा नायक असो तर कधी प्रेयसीला 'इस तरह आशिकी का असर छोड जाऊगा' म्हणणारा नायक, पियानोशिवाय भारतीय सिनेमालाच एक रितेपण येईल. आज 'जागतिक पियानो दिना'निमित्त खुप इच्छा आहे की पियानोच्या योगदानाला एखादी सुरावट वाजवुन tribute द्यावं. पण वाजवता येईल तर ना..!

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल