महानगर
“सर ! केदारनगरला कस जायचं?” शहरातल्या ऐन वर्दळीच्या ठिकाणी एकाने अचानक हातातले एड्रेस कार्ड दाखवत मला प्रश्न विचारला. स्वतःला अस्सल नाशिककर म्हणवणारा मी त्या प्रश्नावर मात्र गोंधळलो. कारण उण्यापुऱ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात अशी वसाहत नाशिकमध्ये आहे हेच माहीत नव्हतं. पुर्वी नाशिकमध्ये पत्ता सांगणं एकदम सोपं काम होत. सैलानी बाबा स्टॉप म्हटलं की जेलरोड, बापु बंगला स्टॉप म्हटलं की इंदिरानगर, डोंगरे वसतिगृह म्हटलं की गंगापुर रोड, आणि त्रिमूर्ती चौक म्हटलं की सिडको ! एवढ्याच भांडवलावर पत्ता सांगितला जाई. गावठाण असेल तर घर नंबरही पुरेसा होता. “स्टॉपवर उतरा, मी घ्यायला येतो” या शब्दात पाहुण्याला थेट घरापर्यंत घेऊन जाण्याइतका पाहुणचार इथे होतो त्यामुळे पाहुण्याला केवळ स्टॉपवर उतरण्याचे कष्ट घ्यावे लागे. पण गेल्या काही वर्षात शहर वाढत चालल आहे. डिजीपीनगर दोघांपैकी कोणतं? शिवाजीनगर दोघापैकी कोणतं? हे ध्यानी ठेवावं लागतं. मविप्र संस्थेच्या कॅम्पसला ‘शिवाजीनगर’ म्हणतात हे नविन बारसं फार उशिरा कळाल. बापु ब्रिजला बापु ब्रिज म्हणायच नाही ही तंबी ऐकावी लागते. सीसीएमचा लॉंगफॉर्म काय? हे विचा...