Posts

मृत्युंजय

Image
सहावीत असताना कधीतरी शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय' कादंबरी वाचली होती. एखाद्या कथानायकाने किंवा कादंबरीने गारुढ करणे म्हणजे काय असते हे पहिल्यांदा अनुभवलं. महारथी कर्ण हा त्या काळात माझ्यासाठी हिरो झाला होता खरंतर त्या वयातील आकलनशक्ती पाहता मृत्युंजय मधल्या वेगवेगळ्या नावांची सूचीच जास्त आवडली होती. बस्तीक, नाराच, सर्पमूख यासारखी बाणांची नावे किंवा सावंतांनी वापरलेली भाषा शैली मनाला खूप भावली होती. एखाद्या लेखकाला शस्त्र,राजे,वृक्ष यांची इतकी नावे कशी काय पाठ असु शकतात याचं कुतूहल वाटायचे. जस जसं वय वाढलं तस-तसा कर्ण आणखी जवळचा वाटू लागला. मरतेसमयी सोन्याचे दात देखील दान करणारा कर्ण, मैत्रीसाठी जीवन त्यागणारा कर्ण, एकटाच दिग्विजयाला निघणारा, कुमारी भूमीवर अंतिम संस्काराची कामना करणारा कर्ण, खूप आवडला होता. जेव्हा तारुण्यात पदार्पण केलं त्यावेळेस आजूबाजूच्या घटनांमुळे कर्ण अधिक व्यापक वाटू लागला. परशुरामाने त्याला ब्रह्मास्त्र शिकवायला नकार दिला, द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या दिली नाही कारण का? तर तो ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय नव्हता ! कर्णाची गुणवत्ता नाका...

नाझिया हसन - एक शोकांतिका

Image
अवघे ३५ वर्षांचे आयुष्य ! पण एवढ्या छोट्या काळातही ती संगीतविश्वावर विजेसारखी तळपली आणि अंतर्धान पावली. कलेला धर्म, प्रांत, जातीची बंधने नसतात हे वाक्य तस घासून गुळगुळीत झालेलं. पण हे ज्यांनी सार्थ करून दाखवल त्यातली एक गायिका म्हणजे 'नाझिया हसन' ! अगदी कमी वयात तिने पाकिस्तानच्या संगीतक्षेत्रात पदार्पण केले आणि पॉप संगीताची मुहूर्तमेढ रोवुन केवळ पाकिस्तानीच नव्हे तर आशियाई संगीतालाच कलाटणी द्यायला भाग पाडले. बेगम अख्तर, गुलाम अली, मेहंदी हसन या जातकुळीतल्या पाकिस्तानी संगीतासाठी ती एक सांस्कृतिक धक्का होती. ३०-४० वर्षांपूर्वीची पाकिस्तानी जनतेची मानसिकता लक्षात घेता तिच्या प्रागतिक संगीत प्रयोगाची कल्पना येईल. कारण तोवर पुढारलेला म्हणवल्या जाणाऱ्या भारतातही पॉप संगीताची पाळमूळ रुजलेली नव्हती. आपला भाऊ झोएब सोबत तिने एकापेक्षा एक सरस पॉप अल्बम दिले. दिलं बोले बुम बुम, डिस्को दिवाने, 'तेरी मेरी दोस्ती ही गाणी आजही नव्या पिढीला तोंडपाठ आहे. तिच्या अल्बमने विक्रीचा उच्चांक गाठला. मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. नाझिया उच्चविद्याव...

असंतोषाच्या उंबरठ्यावर

'फेसबुक-व्हाट्सएप' एक झाले. 'आयडिया-वोडाफोन' एक झाले, 'झोमॅटो-उबेर इटस' एक झाले, या शतकाच्या सुरुवातीला दखलपात्र नसणाऱ्या किंवा अस्तित्वातच नसणाऱ्या या कंपन्यांनी अल्पावधीत मार्केटमध्ये स्वतःच नाव कमावलं. किंवा नाहीशा झाल्या. गेल्या वीस वर्षांत असे अनेक मर्जर-एक्विजिशन झाले आहेत. वरवर सर्वसाधारण वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. मार्क झुकरबर्ग सारखा तरुण स्वतःची कंपनी सुरू करतो काय आणि पिढ्यानपिढ्या उद्योगात काढलेल्या लोकांना मागे टाकून श्रीमंत लोकांच्या यादीत नाव कमावतो काय हे सगळं विस्मयकारक आहे. केवळ टाटा-बिर्ला नाव ऐकायची सवय असलेल्या भारतीयांनी अंबानी-अदानी नावे घ्यायला कधी सुरुवात केली हेच कळले नाही. एकेकाळी मार्केटवर अधिराज्य गाजवणारे कोडॅक, BSNL, जनरल मोटर्स सारखे दिग्गज मागे पडुन त्या क्षितिजावर नविन नावे दिसु लागली आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट वैगेरे नावे माहीत नसलेली मंडळी आज दुकानात जाण्याचे कष्ट न घेता घरबसल्या ऑफर्स बघून ऑर्डर देत आहेत. इतके एप्स, वेबसाईट झाल्यानंतर सरकारी कार्यालयातुन मनुष्यबळ कमी करा म्हणुन ओरड होत आ...

महानगर

“सर ! केदारनगरला कस जायचं?” शहरातल्या ऐन वर्दळीच्या ठिकाणी एकाने अचानक हातातले एड्रेस कार्ड दाखवत मला प्रश्न विचारला. स्वतःला अस्सल नाशिककर म्हणवणारा मी त्या प्रश्नावर मात्र गोंधळलो. कारण उण्यापुऱ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात अशी वसाहत नाशिकमध्ये आहे हेच माहीत नव्हतं. पुर्वी नाशिकमध्ये पत्ता सांगणं एकदम सोपं काम होत. सैलानी बाबा स्टॉप म्हटलं की जेलरोड, बापु बंगला स्टॉप म्हटलं की इंदिरानगर, डोंगरे वसतिगृह म्हटलं की गंगापुर रोड, आणि त्रिमूर्ती चौक म्हटलं की सिडको ! एवढ्याच भांडवलावर पत्ता सांगितला जाई. गावठाण असेल तर घर नंबरही पुरेसा होता. “स्टॉपवर उतरा, मी घ्यायला येतो” या शब्दात पाहुण्याला थेट घरापर्यंत घेऊन जाण्याइतका पाहुणचार इथे होतो त्यामुळे पाहुण्याला केवळ स्टॉपवर उतरण्याचे कष्ट घ्यावे लागे. पण गेल्या काही वर्षात शहर वाढत चालल आहे. डिजीपीनगर दोघांपैकी कोणतं? शिवाजीनगर दोघापैकी कोणतं? हे ध्यानी ठेवावं लागतं. मविप्र संस्थेच्या कॅम्पसला ‘शिवाजीनगर’ म्हणतात हे नविन बारसं फार उशिरा कळाल. बापु ब्रिजला बापु ब्रिज म्हणायच नाही ही तंबी ऐकावी लागते. सीसीएमचा लॉंगफॉर्म काय? हे विचा...

बॉलीवुडची देशभक्ती

Image
26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला मला अलार्म लावून उठायची गरज कधीच पडली नाही कारण ते काम मनोजकुमारचे चित्रपट गल्लीत मोठ्या आवाजात लावलेल्या म्युजिक सिस्टीमद्वारे करत असत. मंडपात आलेल्या वधू वरासाठी "बहारो फुल बरसाओ" हे जस mandatary song आहे तस देशभक्तीपर सकाळ ही महेंद्र कपुरांच्या आवाजात "आ आ आ आ मेरे देश की धरती"ने होते. तीच जर शिवजयंती असली की सकाळ "प्रतापगडच्या पायथ्याशी खान आ आ आ आ" अशी होतें (दोन्ही आलापातील सुरावट वेगळी आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी). तर सांगायचा मुद्दा हा की बॉलीवूड आणि देशभक्ती ह्यांचे अतूट नाते आहे. विदेशी ताकदके देशको मिटानेके नापाक इरादे ध्वस्त करण्यासाठी अमिताभ ते अक्की अशा बऱ्याच जणांनी यथाशक्ती योगदान दिले आहे. इंग्रज भारत सोडून जाताना पाठीमागे चहा, क्रिकेट, थँक यु, सॉरी, टॉम अल्टर…! असा बराच ऐवज सोडून गेले होते. टॉम अल्टर हा दीर्घकाळ विदेशी हुकूमतचा प्रतिनिधी होता. पुढे शक्तिमान आणि कॅप्टन व्योमने त्याला गुरू मानल्यामुळे आम्ही त्याचा राग धरणे सोडून दिले. त्याचाच दुसरा भाऊबंद म्हणजे बॉब ख्रिस्टो ! मिस्टर इंडियाने त्याला ...

झुंज

'दोघांची झुंज लावून मजा पाहणे' हि मानवजातीची जुनी परंपरा आहे. कोंबड्यांपासून ग्लॅडिएटर पर्यँत झुंजीचे अनेक प्रकार व रक्तपात पाहिले गेले आहेत. सध्या ह्यामध्ये 'वैचारिक झुंज' लावणाऱ्या लोकांचा नवा पंथ उदयास आला आहे. भारतात प्रत्येक जाती-धर्मात महापुरुषांची कमतरता नाहीच त्यामुळे फेसबुक-व्हाट्सअपवर 'तुमचा महापुरुष श्रेष्ठ कि आमचा?' अशी वर्गवारी करून पोस्ट करायची. आणि ह्यावर समोरचा डिवचला गेला कि तो आणखी काही लोकांना टॅग किंवा ऍड करून मदतीला बोलवतो. मग बाबा आदमच्या जमान्यात घडलेल्या कोणत्या तरी घटनेचा किंवा वक्तव्याचा पुरावा अथवा स्क्रीनशॉट म्हणून फोटो टाकला जातो. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे व्हाट्सअप इतिहासकार मग दोन चार फॉरवर्ड झालेल्या मेसेजच्या जीवावर समोरच्याला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात कारण अशा लोकांनी वाचनालयात जाऊन कधी पुस्तके चाळली असतील ह्याची सुतराम शक्यता नसते. अमक्या महापुरुषाने 40 लढाया जिंकल्या म्हटले की दुसऱ्याच्या नावावर 200 लढाया जिंकल्याची थाप मारली जाते. त्या महापुरुषाने आयुष्यात कधीही न जिंकलेल्या लढाया त्याच्या नावावर खपवल्या जातात...

10 Years Challenge

सध्या फेसबुकवर 10 years challengeचा trend सुरू आहे. असा एखादा trend आला की माझ्यासारख्या Nostalgia मध्ये जगणाऱ्यांना उधाण येत. खरतर हा trend फेसबुकवर वेगळ्या स्वरूपात चालूच होता. कधी ‘If you remember this’ तर कधी ‘Only 90’s kids will know this’ च्या रूपाने ते समोर येतच होत. दरदिवशी ‘On this day' च नोटिफिकेशन पण झळकत असत. या ओघात एकदा मी #तिशीपारचे_आम्ही ही पोस्ट पण लिहिली. दहा वर्षे हा फार मोठा काळ असतो. २००७ च्या सुमारास अमेरिकेत आर्थिक मंदी सुरू झाली होती. 9/11ला वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळल्यानंतर अमेरिकेने जी आर्थिक धोरणे राबवली. त्यांचे दुष्परिणाम दिसू लागले होते. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर cost cutting केली. रोजगाराच्या फार संधी हिरावल्या गेल्या. २००७ नंतर रोजगाराची स्पर्धा तीव्र होत गेली. सरकारने भरमसाठ इंजिनियरिंग कॉलेजेसला मान्यता दिल्या पण त्या प्रमाणात कंपन्या तयार न झाल्याने मिळेल त्या नोकरीत आणि पगारात इंजिनियर्स काम करू लागले. एकूणच त्या सर्व अभ्यासक्रमाचेच अवमूल्यन झाले. शालांत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी आत्महत्या करतात म्हणून खिरापतीसारखे गुणवाटप सु...