हे व्यर्थ न हो बलिदान
पुलवामा आणि बालाकोटच्या घटनानंतर फेसबुकची वॉल रंगवणाऱ्या मित्रांनो या घटनेची तीव्रता देखिल तेवढीच महत्वाची समजुन दखल घ्या. पंजाबमध्ये अन्न व औषधे निरीक्षक पदावर काम करणाऱ्या नेहा शोरी ह्या प्रामाणिक महिला अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. आज सर्व पंजाब ड्रग माफियांनी वेढला जात असुन देशाची भावी तरुणाई पोखरून काढण्याचे षडयंत्र भारताचे शेजारी राष्ट्र करत आहे. हे कोणत्याही हिंदी सिनेमातील दृश्य नाही. १९७१ साली भारताकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यावर पाकिस्तानला कळून चुकले की भारताला सरळ युद्धात हरवणे अवघड आहे, म्हणून त्यांनी युद्धाची वेगळी रणनीती आखली. पंजाब रेजिमेंट किंवा शीख समुदाय ही भारतीय सैन्याची ताकद आहे हे ओळखुन त्यांनी त्यावरच घाव घालण्याचे ठरवले. फुटीरतावादी खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. पंजाबी युवकांची माथी भडकवली. पुढे भारताच्या प्रधानमंत्र्यांची व लष्करप्रमुखांची आहुती घेऊन धुमसणारा पंजाब काही काळ शांत झाला. आता ड्रग्सच्या माध्यमातून छुप्या युद्धाची तयारी त्यांनी चालवली आहे. नेहा शोरी सारख्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याने ड्रग्स विक्रेत्यांच्या...