मृत्युंजय
सहावीत असताना कधीतरी शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय' कादंबरी वाचली होती. एखाद्या कथानायकाने किंवा कादंबरीने गारुढ करणे म्हणजे काय असते हे पहिल्यांदा अनुभवलं. महारथी कर्ण हा त्या काळात माझ्यासाठी हिरो झाला होता खरंतर त्या वयातील आकलनशक्ती पाहता मृत्युंजय मधल्या वेगवेगळ्या नावांची सूचीच जास्त आवडली होती. बस्तीक, नाराच, सर्पमूख यासारखी बाणांची नावे किंवा सावंतांनी वापरलेली भाषा शैली मनाला खूप भावली होती. एखाद्या लेखकाला शस्त्र,राजे,वृक्ष यांची इतकी नावे कशी काय पाठ असु शकतात याचं कुतूहल वाटायचे. जस जसं वय वाढलं तस-तसा कर्ण आणखी जवळचा वाटू लागला. मरतेसमयी सोन्याचे दात देखील दान करणारा कर्ण, मैत्रीसाठी जीवन त्यागणारा कर्ण, एकटाच दिग्विजयाला निघणारा, कुमारी भूमीवर अंतिम संस्काराची कामना करणारा कर्ण, खूप आवडला होता. जेव्हा तारुण्यात पदार्पण केलं त्यावेळेस आजूबाजूच्या घटनांमुळे कर्ण अधिक व्यापक वाटू लागला. परशुरामाने त्याला ब्रह्मास्त्र शिकवायला नकार दिला, द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या दिली नाही कारण का? तर तो ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय नव्हता ! कर्णाची गुणवत्ता नाका...