Posts

Showing posts from December, 2020

कॅसेट एरा

९० च्या दशकाच्या मधली गोष्ट ! माझ्या मामांच कॅसेट्सच दुकान होत. तो काळ म्हणजे कॅसेटयुगाचा सुवर्णकाळ होता !! विश्वात्मा, त्रिदेव, मोहरा, साजन, बाजीगर, अशा अनेक कॅसेट्स पार्लर,ऑटोरिक्षा, रसवंती, काळी-पिवळी...अशा कानाकोपऱ्यात वाजत असत. रिक्षावाले तर म्युजिक सिस्टिम आहे ह्या कारणास्तव जास्त भाडे घेई. गुलशनकुमारने टी सिरीजच्या माध्यमातून आणलेल्या सोनू निगम, अनुराधा पौडवालच्या आवाजातल्या अनेक भक्तीगीतांच्या कॅसेट्स तडाखेबंद विकल्या जाई. अल्ताफ राजाच्या 'तुम तो ठहरे परदेसी'च्या पिशव्या भरभरून कॅसेट्स मी मामांना वितरकाकडुन आणून दिल्याचे आजही आठवत.  फक्त फिल्मी गाणीच नव्हे तर जॉनी लिव्हर, जॉनी रावत ह्यांच्या मिमिक्री, विनोदांच्या कॅसेट्स पण लोकप्रिय होत्या.  कोळीगीतांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ होती. वेसावची पारू किंवा टॉप टेन कोळीगीताच्या कॅसेट्स हातोहात विकल्या जाई.  छगन चौघुलेंच्या आवाजातल्या चांगुणाची कथा, सती अनुसयाची कथा, चिलया बाळाची कथा.... अशा अनेक आख्यायिकांचा स्वतःचा एक श्रोतावर्ग होता.  सिझनल खपणाऱ्या कॅसेट्स अनुभवातून कळू लागल्या होत्या. स्वातंत्र्यदिन जवळ आला ...