2020
२००८ साली IPL चा पहिला सिझन झाला आणि भारतात एका नव्या युगाची नांदी झाली होती. खेळाच्या जुन्या सर्व संकल्पना, रूढी, गेमप्लॅन, रीतिरिवाज, संघभावना मोडीत काढत क्रिकेटविश्वात एका नव्या युगाचा आरंभ झाला होता. हे युग होत २०-२० क्रिकेटच !! अनेक आजी-माजी खेळाडूंनी ह्यावर टीकेची झोड उडवली. क्रिकेटचा सत्यानाश होईल ही भविष्यवाणी वर्तवली गेली. पैशांची उधळपट्टी, चियरगर्ल्स संस्कृती, सामन्यानंतरच्या पार्ट्या, ग्लॅडीएटरसारखे लिलाव करून घेतले जाणारे खेळाडू हे सर्व नविन होत. हे २०-२० युग काय दाखवणार होत ह्याची झलक पहिल्याच सिझनला दिसली. द्रविड, कुंबळेचा बेंगलोर संघ T20 च्या वेशातील कसोटी संघ म्हणुन हिणवला गेला, सचिन, सौरवचे प्रबळ दावेदार संघ तळाशी राहिले, राजस्थान रॉयलसारखा अनपेक्षित संघ बाजी मारून गेला, स्वप्नील असनोडकर, धवल कुलकर्णी, अशोक दिंडा वैगेरे हिरो मानले गेले. त्या त्या देशाचे खेळाडू इथे पैसे जास्त मिळतात म्हणून स्वतःच्या देशातील क्रिकेट सोडून इथे खेळू लागल्याने "क्लब मोठा की देश?" अशा चर्चा रंगू लागल्या. केवळ देशच काय पण IPL च्या एका संघाशी एकनिष्ठ राहणेही अवघड होऊ लाग...